क्रीडा

Pat Cummins: कमिन्सनं जे बोललं ते करून दाखवलं;1 लाख 30 हजार चाहत्यांची बोलती झाली बंद

कमिन्सने आधी श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि नंतर विराट कोहलीला बाद करून चाहत्यांना धक्का दिला.

Manoj Bhalerao

World Cup 2023 Ind vs Aus: ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने भारताविरुद्धच्या विश्वचषक 2023 च्या फायनलपूर्वी सांगितले होते की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या 1 लाख 30 हजार चाहत्यांना शांत करण्याच्या उद्देशाने मी मैदानात उतरणार आहे आणि जेव्हा तो फायनलसाठी मैदानात उतरला तेव्हा तो जे म्हणाला. त्याने ते करुन दाखवलं.

कमिन्सने आधी श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि नंतर विराट कोहलीला बाद करून चाहत्यांना धक्का दिला.

29व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कमिन्सने कोहलीला बोल्ड केले आणि कोहलीचा त्रिफळा उडवल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली आणि ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. विराट कोहलीही खूप निराश दिसत होता कारण त्याला थर्ड मॅनच्या दिशेने सिंगलसाठी खेळायचे होते पण चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि स्टंपमध्ये गेला आणि त्याला आऊट झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं.

जर या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या संथ खेळपट्टीवर कांगारू गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे. ताजी बातमी लिहेपर्यंत, भारताने ४० षटकात 5 गडी गमावून १९७ धावा केल्या आहेत आणि केएल राहुलने क्रीझवर सूर्यकुमार यादवसह अर्धशतक झळकावल्यानंतर नाबाद आहे. भारतीय संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी आता या दोघांच्या खांद्यावर असेल.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आणि भारताच्या आघाडीच्या फळीला झटपट उद्ध्वस्त केले. भारताला सुरुवातीला लागोपाठ धक्के बसल्यानंतर भारताचा खेळ संथ झाला आहे आणि चौकार, षटकारांचा दुष्काळ बघायला मिळतोय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT