Mohammad Rizwan sakal
क्रीडा

World Cup 2023:पाकिस्तानची श्रीलंकेवर ६ गडी राखून मात, मोहम्मद रिझवान ठरला विजयाचा हिरो

मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक या दोघांनी झळकवलेल्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला.

Manoj Bhalerao

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये मंगळवारी (दि. १० ऑक्टोबर) श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला ३४५ धावांचं बलाढ्य आव्हान दिलं होतं. जे पाकिस्तानने सहज पार केलं.

पाकिस्तानच्या या विजयामध्ये मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी महत्वाची भूमिका बजावली. या दोघांनी झळकवलेल्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला.

श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर कुसल परेरला भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या कुसल मेंडिसनं संयमी खेळ केला आणि आपलं शतक झळकवलं. त्याला पथूम निसंका यानेही उत्तम साथ दिली.

या दोघांनी १०२ धावांची शतकी भागीदारी केली. त्यानंतर निसंका ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या सदिरा समरविक्रमाने मेंडिससोबत मिळून पाकिस्तानी गोलंदाजांना फटकावण्यां काम केलं. कुसल ७७ चेंडूत १२२ धावा करुन बाद झाला, ज्यात त्याने १४ चौकार आणि ६ खणखणीत षटकार खेचले. समरविक्रमा १०८ धावा करुन बाद झाला आणि पाकिस्तानला ३४५ धावांचं आव्हान मिळालं.(Latest Marathi News)

श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर इमाम-उल-हक १२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आझमही आल्या पावली परत गेला. त्याला फक्त १० धावा करता आल्या. अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी खेळी करत डाव सांभाळला आणि पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. शफीकने ११३ धावा केल्या, तर रिझवानने नाबाद १३१ धावा केल्या. पाकिस्तानने ६ गडी राखून श्रीलंकेवर मात केली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT