Cricket World cup 2023 Ticket booking scam Esakal
क्रीडा

World Cup:सावधान! इन्स्टालिंकवरुन वर्ल्डकपच्या तिकीटांचं बुकींग करताय? ही बातमी आधी वाचा

सोशल मीडिया माध्यम 'इंस्टाग्राम'वर 'बुक माय शो'ची लिंक व्हायरल होत आहे, ज्यात भारताच्या सामन्याच्या तिकीटांची विक्री केली जात आहे.

Manoj Bhalerao

Fake World Cup Ticket Link:

भारतामध्ये तब्बल ११ वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. भारतामध्ये तेवढा उत्साही चाहतावर्ग देखील आहे. अनेक असे लोक आहेत, ज्यांना भारताचा क्रिकेट सामना थेट स्टेडियममध्ये जाऊन बघण्याची इच्छा असते. अनेकवेळा या तिकीटांची काळाबाजारी केली जाते.

काही लोकांकडून ही तिकीटं दुप्पट-तिप्पट किमतीने विकली जातात. त्यामुळे सामना स्टेडियममध्ये जाऊन बघण्याची इच्छा खिशावर ताण निर्माण करु शकते. मात्र, भारत आणि बांगलादेश सामन्याच्या तोंडावर सोशल मीडियावर नवा स्कॅम उघडकीस आला आहे.

सोशल मीडिया माध्यम 'इंस्टाग्राम'वर 'बुक माय शो'ची लिंक व्हायरल होत आहे, ज्यात भारताच्या सामन्याच्या तिकीटांची विक्री केली जात आहे. या लिंकवर भारत आणि बांगलादेश सामन्याच्या तिकीटाची विक्री सुरु आहे. हा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

'बुक माय शो' सारख्या दिसणाऱ्या या साईटवर भारत-बांगलादेश सामन्याच्या तिकीटाची किंमत १८५० रुपये इतकी दाखवत आहे. मात्र, ही लिंक खरी नाहीये. अनेक चाहत्यांची अशा खोट्या लिंकच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. त्यामुळे इतक कोणत्याही सामन्याचं तिकीट बुक करताना ऑफिशिअल साईटवरुन बुक करावं, जेणेकरुन तुमची फसवणुक होणार नाही.

भारत आणि बांग्लादेशमध्ये विश्वचषकाचा सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना १९ ऑक्टोबर या दिवशी खेळवला जाईल. भारताने आतापर्यंत या स्पर्थेत ३ सामने खेळले आहेत . या तिनही सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT