क्रीडा

ODI World Cup: 'शेड्यूल बदलणार...', हैदराबाद क्रिकेटच्या 'त्या' विनंतीला BCCIने दाखवली केराची टोपली

Kiran Mahanavar

ICC ODI World Cup 2023 Schedule : भारतात 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 चा थरार रंगणार आहे. याआधी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने 2023 च्या विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली.

हैदराबाद पोलिसांनी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यांसह बॅक टू बॅक सामने आयोजित करताना सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने BCCI ला ODI कप वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. मात्र, वेळापत्रकात कोणताही बदल शक्य नसल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले की, विश्वचषकासाठी हैदराबादच्या मैदानाची जबाबदारी माझ्याकडे आहे. काही अडचण किंवा काही बाबी असतील तर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. विश्वचषकाचे वेळापत्रक बदलणे सोपे नाही आणि तसे होण्याची शक्यताही नाही. फक्त बीसीसीआय वेळापत्रक बदलू शकत नाही. संघ, आयसीसी, सर्वांचा सहभाग आहे.

बऱ्याच विलंबानंतर यंदाच्या जूनमध्ये वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि ICC यांनी नऊ सामन्यांचे वेळापत्रक बदलले, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठ्या संघर्षाचा समावेश होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एक दिवस आधी 14 ऑक्टोबरला होणार आहे.

याशिवाय हैदराबादमधील श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानचा सामना 12 ऑक्टोबर वरून 10 ऑक्टोबरला हलवण्यात आला आहे. हैदराबाद आधीच 9 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड सामन्याचे आयोजन करत आहे. हैदराबाद पोलिसांनी सलग दोन सामन्यांसाठी सुरक्षा देण्यावर आक्षेप घेतला होता.

2016 च्या टी-20 विश्वचषकानंतर पाकिस्तानचा संघ प्रथमच भारतात खेळणार आहे. दोन विश्वचषक सामने आणि दोन सराव सामने एकाच ठिकाणी खेळायचे असल्याने संघ हैदराबादमध्ये दीर्घकाळ मुक्काम करेल. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. 25 ऑगस्टपासून विश्वचषकाची तिकिटे विक्रीस सुरू होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT