ODI World Cup 2023 IND vs AFG Rohit Sharma Records sakal
क्रीडा

IND vs AFG Rohit Sharma : भारत-अफगाणिस्तान सामन्यात विक्रमांचा मुसळधार पाऊस! एकट्या रोहितने केले 'हे' मोठे पराक्रम

Kiran Mahanavar

ODI World Cup 2023 IND vs AFG Rohit Sharma Records : वर्ल्डकप 2023 च्या नवव्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 35 षटकांत केवळ 2 गडी गमावून हे लक्ष्य पार केले. या सामन्याचा हिरो ठरला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, ज्याने आपल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला.

273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला फ्लाईंग स्टार्ट दिली. त्याचवेळी त्याला दुसऱ्या टोकाकडून इशान किशनची चांगली साथ मिळाली. रोहितने या सामन्यात केवळ 84 चेंडूत 130 धावांची खेळी केली. रोहितच्या बॅटमधून 16 चौकार आणि 5 षटकार आले. त्याच्यासोबत सलामीला आलेल्या ईशानने 47 चेंडूत 47 धावा केल्या. यानंतर विराट कोहलीने नाबाद 55 आणि श्रेयस अय्यरने नाबाद 25 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.

मात्र या एकाच सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अनेक विक्रम रोहित शर्माने मोडीत काढले. रोहित आता वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक शतके (7) झळकावणारा फलंदाज बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक षटकार (555) आहेत. याशिवाय रोहित वर्ल्डकप मध्ये सर्वात जलद 1000 धावा (19 डाव) करणारा फलंदाज बनला आहे. रोहित वर्ल्डकप मध्ये सर्वात जलद शतक (63) ठोकणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके

  • ४५ : सचिन तेंडुलकर (भारत)

  • २९ : रोहित शर्मा (भारत)

  • २८ : सनथ जयसूर्या (श्रीलंका)

  • २७ : हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)

  • २५ : ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)

'वनडे'मध्ये सर्वाधिक षटकार

  • ५५६ : रोहित शर्मा (भारत)

  • ५५३ : ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)

  • ४७६ : शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)

  • ३९८ : ब्रँडम मॅकलम (न्यूझीलंड)

  • ३८३ : मार्टिन गुप्तिल (न्यूझीलंड)

'वनडे'मध्ये सर्वाधिक शतके

  • ४९ : सचिन तेंडुलकर (भारत)

  • ४७ : विराट कोहली (भारत)

  • ३१ : रोहित शर्मा (भारत)

  • ३० : रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)

  • २८ : सनथ जयसूर्या (श्रीलंका)

विश्वकरंडकात सर्वाधिक शतके

  • ७ : रोहित शर्मा (भारत, १९ सामने)

  • ६ : सचिन तेंडुलकर (भारत, ४४ सामने)

  • ५ : रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया, ४२ सामने)

  • ५ : कुमार संगकारा (श्रीलंका, ३५ सामने)

  • ४ : डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया, १९ सामने)

तत्पूर्वी, अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून हशमतुल्ला शाहिदीने 80 धावा केल्या. अजमतुल्ला उमरझाईने 62 धावांची खेळी केली. मात्र, दिल्लीच्या सपाट खेळपट्टीवर ही धावसंख्या खूपच कमी राहिली. जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानला कमी धावसंख्येवर रोखण्याची उत्तम कामगिरी केली. या सामन्यात बुमराहने 4 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने 2 तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT