ICC 2023 ODI World Cup : या वर्षाच्या अखेरीस भारतीय भूमीवर होणार्या क्रिकेटच्या महाकुंभाच्या तारखांबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. एवढेच नाही तर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना कोणत्या दिवशी आणि कोणत्या मैदानावर होणार याचीही बरीच माहिती समोर आली आहे.
याशिवाय 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सामने कोणत्या शहरांमध्ये खेळवले जाणार हे रहस्यही उघड झाले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार या वर्षी भारतात होणारा 2023 विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या असल्याचे या अहवालात समोर आले आहे. अहवालानुसार 2023 विश्वचषक स्पर्धेत तीन बाद फेरीसह एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.
सर्व सामने भारतातील 12 शहरांमध्ये खेळवले जातील. 2023 विश्वचषकाचे सामने हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई येथे खेळवले जातील. भारत 10 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.
आता टीम इंडियाचे यंदाचे सर्वात मोठे लक्ष्य 2023च्या वनडे विश्वचषकावर नाव कोरण्याचे आहे. 12 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर खेळलेल्या 2011 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने जिंकले होते. अशा परिस्थितीत यावेळी भारत 2023 विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेला अजून 7 महिने बाकी आहेत.
यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर 7 जून ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.