World Cup 2023 Opening Ceremony Date : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपची सुरूवात ही इंग्लंड आणि न्यूझीलंड या गतविजेत्या आणि उपविजेत्या संघातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून याच स्टेडियमवर वर्ल्डपचा ग्रँड उद्घाटन सोहळा देखील होणार आहे.
मात्र हा उद्घाटन सोहळा इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्याविरूद्धच्या सामन्यापूर्वी होणार नसून तो आदल्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला संध्याकाळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी आयसीसी कॅप्टन्स डे देखील आहे.
वर्ल्डकपचे सर्व सराव सामने हे 3 ऑक्टोबरला संपणार आहेत. त्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये दाखल होतील. हा एक ग्रँड उद्घाटन सोहळा असणार आहे यात शंका नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 4 ऑक्टोबरला तुरूवअनंतपुरमवरून अहमदाबादमध्ये सकाळी दाखल होईल. यापूर्वी भारत नेदरलँडविरूद्ध सराव सामना खेळणार आहे.
दरम्यान, आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्याची रूपरेषा कशी असले याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
क्रिकबझनुसार हा सोहळा दैदिप्यमान असणार आहे. बॉलिवूडमधील आघाडीचे गायक आणि ख्यातनाम आंतरराष्ट्रीय स्टार्स ही संध्याकाळ यादगार करण्याची शक्यता आहे.
वर्ल्डकपमधील सामने हे भारतीय वेळानुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्याच्या आधी उद्घाटन सोहळा आयोजित करणे शक्य होणार नाही.
त्यामुळेच उद्घाटन सोहळा हा पहिल्या सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईट शो आणि आतषबाजी सोबतच धमाकेदार नृत्याचं प्रदर्शन देखील होईल.
या उद्घाटन सोहळ्याला चाहत्यांसोबतच आयसीसी आणि बीसीसीआयचे सर्व उच्च अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. बीसीसीआय आणि आयसीसी या उद्घाटन सोहळ्याला जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डांच्या उच्च अधिकाऱ्यांना देखील बोलवणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.