world cup 2023 points table afghanistan 
क्रीडा

Points Table मध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत करून इतिहास रचला, विश्वविजेता संघ तळात

Kiran Mahanavar

World Cup 2023 Points Table Afghanistan : अफगाणिस्तानने पाकिस्तान क्रिकेट संघावर विजय मिळवत वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला. अवघ्या 10 दिवसांत अफगाणिस्तान संघाने दोन मोठ्या संघांना पराभूत करून आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप मध्ये अपसेट निर्माण केले. आधी विश्वविजेत्या इंग्लंड आणि नंतर पाकिस्तान संघाचा पराभव केला. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली.

रविवार 23 ऑक्टोबर हा दिवस केवळ आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपसाठीच नाही तर अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासासाठीही एक मोठा संस्मरणीय दिवस ठरला. या संघाने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पहिला विजय नोंदवला. नाणेफेक जिंकल्यानंतर बाबर आझमने अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कर्णधार बाबरसह अब्दुल्ला शफीकने अर्धशतकी खेळी खेळून संघाला 282 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अफगाणिस्तानच्या नूर अहमदने 3 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इब्राहिम झदरन आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी स्फोटक सलामी देत ​​विजयाचा पाया रचला आणि रहमत शाहने कर्णधार हशमतुल्लासह संघाला विजयापर्यंत नेले. संघाने 49 षटकात 2 गडी गमावून विजय नोंदवत इतिहास रचला.

अफगाणिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचा पराभव करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली. दहाव्या क्रमांकावर असलेल्या या संघाने थेट सहाव्या क्रमांकावर कब्जा केला आहे. पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर असला तरी इंग्लंडने तळ गाठला आहे. 5 पैकी 5 जिंकून भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड संघ दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलग दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलिया आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT