एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या गुणतालिकेत टॉप-4 साठीची लढत सध्या खूपच रोमांचक दिसत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशवर 149 धावांनी विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकन संघाने आठ गुणांसह न्यूझीलंडला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरून मागे टाकले आहे.
आफ्रिकेने मेगा स्पर्धेत आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मागील सामने मोठ्या फरकाने जिंकण्याबरोबरच त्यांनी त्यांचा नेट रन रेट देखील +2.370 आहे.
भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली असून त्यांनी आपले सर्व पाच सामने जिंकले आहेत. 10 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले आहे. टीम इंडियाचा नेट रन रेट सध्या 1.353 आहे. त्याच वेळी न्यूझीलंड संघ आता गुणतालिकेत 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांचा नेट रन रेट 1.481 आहे. ऑस्ट्रेलियन संघ 4 गुणांसह चौथ्या स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट -0.193 आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा संघ आता गुणतालिकेत 2 गुणांसह शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच वेळी इंग्लंड संघ 2 गुणांसह नवव्या स्थानावर आला आहे त्यांचा नेट रन रेट -1.248 आहे. याशिवाय पाकिस्तान सध्या 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे तर अफगाणिस्तान संघ समान गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. नेदरलँड आणि श्रीलंका प्रत्येकी 2 गुणांसह सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.