World Cup 2023 | Rajeev Shukla sakal
क्रीडा

World Cup 2023 : 'वर्ल्डकप ठिकाणांमध्ये राजकारण...' BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे मोठे वक्तव्य

सकाळ ऑनलाईन टीम

विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये कोणतेही राजकारण झालेले नाही किंवा राजकीय हस्तक्षेप झालेला नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिले आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी आम्ही जास्तीत जास्त ठिकाणे आणि विभागांना प्राधान्य दिले असल्याचेही ते म्हणाले.

ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान देशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक काल जाहीर झाले आणि ज्या ठिकाणांचा यात समावेश नव्हता त्यांच्या क्रिकेट संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एरवी हमखास स्थान असलेल्या मोहालीत एकही सामना होणार नाही त्यामुळे पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग यांनी राजकीय हस्तक्षेपाचा थेट आरोप केला आणि हा मुद्दा बीसीसीआयच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले.

सराव सामने धरून आम्ही १२ ठिकाणे निवडली आणि प्रत्येक विभागाला त्यात स्थान दिले, असे याअगोदर कधीही घडले नव्हते, असे सांगत राजीव शुक्ला म्हणाले. १० ठिकाणी मुख्य स्पर्धेचे सामने होणार आहेत; तर तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी येथे सराव सामने होणार आहेत.

दक्षिण विगागात चार ठिकाणी, मध्य विभागात एका ठिकाणी, पश्चिम आणि उत्तर विभागात प्रत्येकी दोन ठिकाणी यासह दिल्ली आणि धरमशाला (उत्तर विभाग) येथेही सामने होणार असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.

ठिकाण निवडताना कोणतेही राजकारण झालेले नाही किंवा कोणावर अन्याय केलेला नाही. रोटेशन पद्धतीनुसार प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगून शुक्ला म्हणाले, विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्यासाठी मोहालीला प्राधान्य देण्यात आले होते. पंजाब क्रिकेट संघटनेने मुल्लानपूर हे नवे स्टेडियम तयार होत आहे आणि सध्याचे मोहालीतील स्टेडियम आयसीसीच्या दर्जाचे राहिलेले नाही त्यामुळे तेथे सामना आयोजित करण्याचा प्रश्नच येत नाही.

पंजाब क्रिकेट संघटनेला द्विराष्ट्रीय मालिकेतील सामने दिले जातात तेही रोटेशन पद्धतीने असतात. बीसीसीआयच्या आवडी-निवडीनुसार ठिकाणे ठरवली जात नसतात. तसेच विश्वकरंडकासारख्या स्पर्धांची ठिकाणे निश्चित करताना आयसीसीच्या नियमांना प्राधान्य दिले जाते, असे शुक्ला यांनी सांगितले. तिरुअनंतपुरम येथे प्रथमच सराव सामना होणार आहे. कोणत्या विभागाला आम्ही जाणीवपूर्वक वगळले असे नाही, सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर ठिकाणे निवडण्यात आली, असेही शुक्ला यांनी सांगितले.

राजीव शुक्ला हे उत्तर प्रदेशचे असून लखनौमधील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरही विश्वकरंडक स्पर्धेचे सामने होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये याअगोदर कधी विश्वकरंडक स्पर्धेचे सामने झाले नव्हते, असे मत शुक्ला यांनी मांडले.

उत्तम निवड, योग्य विभागणी ः गांगुली

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विश्वकरंडक स्पर्धेची ठिकाणे निवडल्याबद्दल त्यांना शाबासकी दिली आहे. उत्तम निवड आणि योग्य विभागणी अशा शब्दांत त्यांनी बीसीसीआयचे कौतुक केले. या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेची मीसुद्धा आतुरतेने वाट पाहत आहे. मी अध्यक्ष असतानाही टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयला मिळाले होते, परंतु कोरोनामुळे ती स्पर्धा भारतात झाली नव्हती, त्यामुळे ती संधी माझ्याकडून हुकली होती, असे गांगुली यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

नागपूरमध्येही सामना नाही

नागपूरमधील जामठा येथील भव्य स्टेडियममध्येही आंतरराष्ट्रीय सामने होत असतात, परंतु या वेळी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी पाच सामने होत असताना नागपूरला वगळण्यात आले आहे. केरळमध्येही उत्तम स्टेडियम असताना तेथे एकही सामना नाही, अशी नाराजी शशी थरूर यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi in Dhule: ''त्या दिवशी मी गप्प बसलो पण...'' मोदी लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची 'ती' इच्छा, पंतप्रधानांचा धुळ्यात शब्द

Latest Maharashtra News Updates : खासदारांनी संसदेत कोकणाविषयी कोणते प्रश्न मांडले - राज ठाकरे

Viral Video : पहिल्यांदा दिसली दुआ सिंह पदुकोणची झलक ; लेकीबरोबर दीपिका-रणवीरची पहिली ट्रिप

Stock Market: ट्रम्प जिंकले, व्याजदर कपात झाली; तरीही शेअर बाजाराची घसरण का थांबत नाही? जाणून घ्या चार मोठी कारणे

IND A vs AUS A : ढेंग्याखालून क्लिन बोल्ड! KL Rahul ची विचित्र विकेट अन् टीम इंडियाचा निम्मा संघ ५६ धावांत तंबूत Video

SCROLL FOR NEXT