World Cup 2023 Schedule BCCI : बीसीसीआय जरी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असली तरी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या वेळापत्रकात सातत्याने होणारे बदल आणि नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात झालेल्या विलंबामुळे आयसीसीसह इतर क्रिकेट संघटना जाम भडकल्या आहेत. बीसीसीआय आणि आयसीसीने अखेर आज (दि. 9) वर्ल्डकपचे बदलेले वेळापत्रक जाहीर केले.
बीसीसीआय आणि आयसीसीने 27 जुलैला भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वेळापत्रकात बदल करण्यात आला. वेळापत्रकातील बदल जाहीर करण्यासाठी बीसीसीआयने बराच वेळ घेतला. यामुळे तिकीट विक्री देखील सुरू करण्यात आलेली नाही. वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तरी अजून तिकीट विक्री सुरू झालेली नाही.
गेल्या आठवड्यात राज्य संघटनांनी आपली तिकीट विक्री योजना बीसीसीआयकडे सादर केली आहे. वर्ल्डकपसाठी 60 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये आयोजित झालेल्या टी 20 वर्ल्डकपची तिकीटे ही सहा महिन्यापूर्वीच विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.
जीओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह अनेक क्रिकेट बोर्ड हे नाराज आहेत. त्यांना वर्ल्डकपमधील सामन्यांच्या तारखा निश्चित न झाल्यामुळे आपल्या प्रवासाची आखणी करता येत नाहीये. क्रिकेट बोर्डांना लॉजेस्टिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
चाहत्यांसाठी तर मोठी समस्या निर्माण झाली आहे. चाहत्यांनी 27 जुलैला वेळापत्रक जाहीर झाल्या झाल्या भारत पाकिस्तान सामन्यासह इतर सामन्यांसाठी विमानाची तिकीटे आणि हॉटेल आरक्षित केली होती. आता सामन्यांची तारीखच बदलल्यामुळे त्या सर्वांची मोठी अडचण झाली आहे.
त्यात बीसीसीआयने इ-तिकीट सुविधा दिलेली नाही. ऐनवेळी तिकीट काढणाऱ्या चाहत्यांना स्टेडियममधील बॉक्स ऑफिसवरून तिकीट घ्यावं लागणार आहे. बीसीसीआयने आधी तिकीट आरक्षित करणाऱ्या चाहत्यांना तिकीटाची हार्ड कॉपी पाठवण्याची जबाबदारी ही तिकीट पार्टनर बूक माय शो आणि पेटीयम यांच्यावरच सोपवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.