World Cup 2023 Semi Final : भारताने वर्ल्डकप 2023 मधील आपला सलग सातवा सामना जिंकला. भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने सेमी फायनलचे तिकीट नक्की केले. भारत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनल गाठणारा पहिला संघ ठरला आहे.
भारताने सेमी फायनल गाठताच मुंबई आणि कोलकातामधील हॉटेल्सची चांदी होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या रूमचे भाडे जवळपास 80 टक्क्यांनी वाढवले.
मुंबईत 15 नोव्हेंबरला पहिला सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच मुंबईतील हॉटेल रूमचे भाडे 13 ते 80 टक्क्यांनी वाढले आहेत. तर कोलकात्यात 16 नोव्हेंबरला वर्ल्डकपचा दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे. कोलकात्यातील रूमचे भाडे हे 10 ते 66 टक्क्यांनी वाढले आहेत.
मुंबईतील देशांतर्गत विमानतळाच्या जवळ असलेल्या ताज सांताक्रूज 14 ते 15 नोव्हेंबरदरम्यान एका रात्रीसाठी 19,000 ते 20,000 हजार रूपये आकारत आहे. तर बांद्रा येथील ताज लँड्स हॉटेल एका रूमचं भांड 20,000 ते 25,000 रूपये आकारात आहे.
हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे एका रात्रीचे रूम भाडे हे सरासरी 15,000 तरे 16,000 हजार इतके आहे. दोन आणि तीन स्टार हॉटेलमधील रूमचे एका रात्रीचे भाडे हे 5,000 ते 18,000 पर्यंत पोहचले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.