World Cup 2023 Semi Final Scenario : भारतात खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कपमध्ये अतिशय रोमांचक सामने खेळले गेले. दोन-तीन सामन्यात छोट्या सघांनी मोठ्या सघांना चांगले धक्के दिलेले हे पाहायला मिळाले. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत 25 सामने खेळले गेले आहेत आणि सर्व 10 संघांनी किमान 5 लीग सामने खेळले आहेत.
सर्व संघांनी प्रत्येकी एक तरी सामना जिंकला आहे. पण भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीत खूप पुढे गेले आहेत, तर गतविजेता इंग्लंड या शर्यतीत खूप मागे पडला आहेत.
गुणतालिकेत पहिले 4 स्थान मिळवणारे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पाच सामने जिंकणाऱ्या भारताची उपांत्य फेरी गाठणे निश्चित दिसत आहे. दक्षिण आफ्रिकाही दावेदार आहे. इतर संघांची काय स्थिती जाणून घ्या...
भारतीय संघ
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिले सर्व 5 सामने जिंकले आहेत. संघ 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यासह 2023 च्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. संघाचे अजून 4 सामने बाकी आहेत, त्यापैकी पुढील 2 सामने जिंकल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.
संघाला लखनौमध्ये 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धचा सहावा सामना खेळायचा आहे. यानंतर श्रीलंकेविरुद्धचा सातवा सामनाही जिंकला तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. 5 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकाविरुद्ध आठवा तर 12 नोव्हेंबरला नेदरलँडविरुद्ध भारताचा शेवटचा सामना आहे.
दक्षिण आफ्रिका
नेदरलँड्सविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकाने जोरदार पुनरागमन केले. त्याचे अजून ४ सामने बाकी आहे, पण उपांत्य फेरीसाठी 3 सामने जिंकणे पुरेसे असेल.
उर्वरित सामने : ४ (पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत, अफगाणिस्तान)
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पाकिस्तान 27 ऑक्टोबर
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध न्यूझीलंड - 1 नोव्हेंबर
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत - 5 नोव्हेंबर
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अफगाणिस्तान - 10 नोव्हेंबर
न्यूझीलंड
भारताच्या पराभवानंतर न्यूझीलंडची विजयाची मालिका निश्चितच खंडित झाला आहे, परंतु 3 सामने जिंकल्यानंतर ते उपांत्य फेरीत आरामात पोहोचेल. त्याचे 4 सामने बाकी आहेत.
उरलेले सामने: 4 (ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका)
न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया - 28 ऑक्टोबर
न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका - 1 नोव्हेंबर
न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान - 4 नोव्हेंबर
न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका - 9 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियन संघ 5 पैकी 3 सामने जिंकून 6 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांना 12 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील चारपैकी किमान 3 सामने जिंकावे लागतील. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 3 पेक्षा कमी सामने जिंकले तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड - 28 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड - 4 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान - 7 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेश - 11 नोव्हेंबर
श्रीलंका
इंग्लंड विरुद्ध मोठा विजयानंतर श्रीलंकेने पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानला मागे टाकले. श्रीलंकेचा नेट रन रेट -0.2 झाला आहे, ज्यामुळे हा संघ 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचानेट रन रेट -0.4 आहे.
उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी श्रीलंकेला नक्कीच संधी आहे, पण संघाला आगामी चारही सामने जिंकावे लागतील. श्रीलंकेचा संघ यावेळी लयीत दिसला नाही. अशा परिस्थितीत भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे सोपे नसेल.
पाकिस्तान
पाकिस्तान संघाने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. त्यांना आणखी 4 सामने खेळायचे आहेत. जर त्यांना उपांत्य फेरीत जायचे असेल, तर त्याला उरलेले 4 सामने जिंकावे लागतीलच, शिवाय धमाकेदार शैलीत जिंकावे लागतील, जेणेकरून त्याचा नेट रन रेट सुधारेल. याशिवाय पहिल्या तीन संघांचे गुण 14 नसावेत. असे झाल्यास पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकतो.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 27 ऑक्टोबर
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश - 31 ऑक्टोबर
पाकिस्तान विरुद्ध - न्यूझीलंड 4 नोव्हेंबर
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड - 11 नोव्हेंबर
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, अफगाणिस्तानचा संघ 5 सामन्यांत 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मात्र त्याचे आगामी सामने चुरशीचे होणार आहेत. त्यांना श्रीलंका, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
जिथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे काम असणार आहे. जर अफगाणिस्तानने हे सामने जिंकले तर त्यांना थोडी आशा असेल उपांत्य फेरीत जाण्याची पण ही शक्यता फार कमी आहे.
इंग्लंड
2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. संघाने पाचपैकी चार सामने गमावले असले तरी गतविजेत्याच्या आशा कायम आहेत. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला प्रथम त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील जेणेकरून त्यांना 10 गुणांचा टप्पा गाठता येईल. त्यांचे पुढील 4 सामने भारत, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तान विरुद्ध आहेत. याशिवाय, त्यांना प्रार्थना करावी लागेल की न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या प्रत्येक सामन्यात पराभव व्हावा. ह हे कठीण दिसत आहे त्यामुळे इंग्लंड जवळपास बाहेर पडला आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत, 29 ऑक्टोबर
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 4 नोव्हेंबर
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स, 8 नोव्हेंबर
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, 11 नोव्हेंबर
नेदरलँड आणि बांगलादेश
नेदरलँडचा संघ या वर्ल्ड कप स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. संघाचे 5 सामन्यात केवळ 1 विजयासह 2 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. आगामी सामने भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी होणार आहेत. हे सर्व सामने जिंकणे हा चमत्कारच म्हणावा लागेल. आकडे याची साक्ष देत नाहीत.
यानंतर बांगलादेशातील परिस्थितीही खराब दिसत आहे. 5 सामन्यात फक्त एक विजय आहे. पुढचे सामने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी आहेत. या तिघांमध्ये विजय नोंदवणे फार कठीण आहे. नेदरलँडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र चारही सामने जिंकणे सोपे नसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.