World Cup 2023 Tickets BCCI ICC  Esakal
क्रीडा

World Cup 2023 Tickets : सेमी फायनल- फायनल सामन्याचे आज होणार तिकीट बुकिंग

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Tickets : भारतात 5 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 च्या तिकीट विक्रीसाठी बीसीसीआय आणि आयसीसीने टप्प्या टप्प्याने तिकीट बुकिंग सुरू केलं. आज वर्ल्डकपच्या सेमी फायनल आणि फायनलच्या तिकीटांसाठी बुकिंग होणार आहे. हे बुकिंग वेबसाईट आणि तिकीट विक्री पार्टनर बूक माय शॉवरून करता येणार आहे.

वर्ल्डकपचे दोन सेमी फायनल सामने कोलकाता आणि मुंबई येथे होणार आहेत. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला अहमदाबाद येथे होणार आहे.

वर्ल्डकपच्या तिकीट बुकिंगमध्ये सुरूवातीला गोंधळ निर्माण झाला होता. विशेष करून भारताच्या सामन्यावेळी तिकीट विक्रीतील गोंधळावर चाहत्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी चाहत्यांना बुक माय शोकडून यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

चाहते आज रात्री 8 वाजल्यापासून वर्ल्डकपच्या तीन शेवटच्या सामन्यांसाठी आपले तिकीट बुक करू शकतात. भारतीय चाहत्यांना आपला संघ फायनलमध्ये पोहचेल अशी आशा आहे. त्यामुळे ते फायनल याची देही याची डोळा पाहण्याची संधी गमावणार नाहीत.

बुक माय शोने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की चाहत्यांना दोन सेमी फायनल आणि फायनल सामन्याचे तिकीट बुक करताना थोडा संयम बाळगावा लागणार आहे.

सेमी फायनल - फायनलचे वेळापत्रक

15 नोव्हेंबर, बुधवार, पहिला सेमी फायनल सामना, वानखेडे स्टेडियम.

16 नोव्हेंबर, गुरूवार, दुसरा सेमी फायनल सामना, इडन गार्डन, कोलकाता.

19 नोव्हेंबर, रविवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Assembly Election: महाविकास आघाडीत संकटातून संधीचा फायदा घेत शरद पवारांनी कसा साधला 'राजकीय डाव'

Stock Market Crash: 40 लाख कोटी बुडाले; दिवाळीपूर्वी शेअर बाजाराची वाईट अवस्था, काय आहे खरे कारण?

Gold Rates: धनत्रयोदशीपूर्वी सोने झाले स्वस्त झाले; चांदीचे भावही घसरले, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव

Mohammed Shami ला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्थान का मिळालं नाही? रोहित शर्मानं सांगितलं कारण

Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

SCROLL FOR NEXT