World Cup 2023 Semi Final : वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत. तर आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात सामना खेळल्या जात आहे. आतापर्यंतच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारत अव्वल आहे. त्याने तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत.
भारतीय संघाने अशीच कामगिरी कायम ठेवल्यास उपांत्य फेरीचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा होईल. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.
भारताने पहिल्या तीन सामन्यात शानदार विजय नोंदवला आहे. यातील दोन सामने मोठ्या संघांविरुद्ध होते. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव केला होता. यानंतर अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव झाला. तर अहमदाबादमध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. सलग तीन सामने जिंकून भारताने उपांत्य फेरीपर्यंतचा दावा मजबूत केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये खतरनाक फॉर्ममध्ये असलेल्या तीन संघांशी भारताचे सामने आजून बाकी आहे. पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडने तिन्ही सामने जिंकले आहेत. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबरला सामना होणार आहे.
यानंतर 29 ऑक्टोबरला भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतचा सामना 5 नोव्हेंबरला होणार आहे. हे तिन्ही सामने भारतासाठी खूप महत्त्वाचे असतील.
वर्ल्ड कप स्पर्धेतील सध्याच्या गुणतालिकेत न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 3 सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. न्यूझीलंडचे 6 गुण आहेत. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे भारताबरोबरच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हेही उपांत्य फेरीचे दावेदार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.