World Cup 2023 Ticket Chaos  esakal
क्रीडा

World Cup 2023 Ticket : 'भारतीय संघात निवड होणं यापेक्षा सोपं'... BCCI च्या भोंगळ कारभारामुळे चाहते 12 तास 'रांगेत'

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Ticket Chaos : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ची सुरूवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. बीसीसीआयने वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर केल्याने चाहत्यांना तिकीट विक्रीची सुरूवात करण्यासही उशीर झाला होता. बीसीसीआय आणि आयसीसीने यावेळी तिकीटविक्रीसाठी खास प्लॅन आखला होता.

आधी आयसीसीच्या वेबसाईटवर नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. बीसीसीआयने तिकीट विक्री पार्टनर म्हणून मास्टर कार्ड आणि बुक माय शो या दोघांची निवड केली आहे. मात्र प्री - बुकिंगवेळीच चाहत्यांना तब्बल 12 तास ताटकळत बसावं लागलं.

भारतीय चाहत्यांना सामन्यांची तिकीटं बुक करताना खूप अडचणी आणि मनस्ताप सहन करावा लागला. क्रिकेट चाहत्यांनी आपल्या या नाराजीला सोशल मीडियामार्फत वाट मोकळी करून दिली.

वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीट विक्रीसाठी बीसीसीआय आणि आयसीसीने प्री सेल तिकीट बुकिंगचा घाट घातला. यातही तीन टप्पे ठेवण्यात आले होते. 24 ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यात भारताव्यतिरिक्त इतर देशांचे सामने आणि सराव सामन्यांच्या तिकीट बुकिंगचा समावेश होता.

या दिवशी तिकीट बुकिंगवर क्रिकेट चाहत्यांच्या चांगल्याच उड्या पडल्या. अवघ्या 15 मिनिटात हाऊसफुलचा बोर्ड लागला.

29 ऑगस्टला सराव सामने वगळून भारताच्या सर्व सामन्यांचे प्री - तिकीट बुकिंग झाले. मात्र यावेळी अनेक क्रिकेट चाहत्यांना बुकिंग करताना अनेक अडचणी आल्या.

कोल्हापुरातील क्रिकेट चाहते नचिकेत कुलकर्णी यांनी अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत - पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही भयंकर अनुभव आला. पेशाने डॉक्टर असलेल्या नचिकेत कुलकर्णी यांनी क्रिकेटच्या प्रेमापोटी वेळात वेळ काढून तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला.

मात्र भारत - पाकिस्तान सामन्याच्या तिकीट बुकिंगवेळी त्यांना प्रक्रिया पार पाडण्यासाठी तब्बल 12 तास थांबा असं सांगण्यात आलं. त्यातही ज्यावेळी तुमचा टर्न येईल त्यावेळी तुम्ही त्वरित सीट निवडणं गरजेचं असल्यांचही सांगण्यात आले. यामुळे वैतागलेल्या नचिकेत कुलकर्णी यांनी, 'वर्ल्डकप सामन्याचं तिकीट बुक करण्यापेक्षा भारतीय संघात निवड होणं हे खूप सोपं दिसतंय.' अशी खोचक प्रतिक्रिया देत बीसीसीआयला चिमटा काढला.

नचिकेत कुलकर्णी यांच्यासारखा अनुभव अनेक क्रिकेट चाहत्यांना आला. एका क्रिकेट चाहत्याने ट्विटवर पोस्ट केली की, 'जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची तिकीट बुकिंग व्यवस्था ही टुकार अशी आहे. यांच्या वेडेपणामुळे दोन तास वाट पहावी लागली.'

बीसीसीआयने 14 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजल्यापासून सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांचे प्री - बुकिंग सुरू होणार आहे. तर तिकीट विक्री ही त्याच दिवशी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होईल. बीसीसीआयने वर्ल्डकपच्या तिकीट विक्रीसाठी पुढीलप्रमाणे टप्पे ठेवण्यात आले आहेत.

  • 25 ऑगस्ट रात्री 8 पासून पुढे (भारतीय वेळेनुसार) : भारताव्यतिरिक्त इतर देशांचे सराव सामने आणि मुख्य सामने.

  • 30 ऑगस्ट रात्री 8 पासून पुढे (भारतीय वेळेनुसार) : भारताचे गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम येथील सराव सामने.

  • 31 ऑगस्ट रात्री 8 पासून पुढे (भारतीय वेळेनुसार) : भारताचे चेन्नई, दिल्ली आणि पुणे येथील सामने.

  • 1 सप्टेंबर रात्री 8 पासून पुढे (भारतीय वेळेनुसार) : भारताचे धरमशाळा, लखनौ आणि मुंबईतील सामने.

  • 2 सप्टेंबर रात्री 8 पासून पुढे (भारतीय वेळेनुसार) : भारताचे बंगळुरू आणि कोलकाता येथील सामने.

  • 3 सप्टेंबर रात्री 8 पासून पुढे (भारतीय वेळेनुसार) : भारताचे अहदमाबादमधील सामने.

  • 15 सप्टेंबर रात्री 8 पासून पुढे (भारतीय वेळेनुसार) : सेमी फायनल आणि फायनल

*बीसीसीआयने 14 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजल्यापासून सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांचे प्री - बुकिंग सुरू होणार आहे. तर तिकीट विक्री ही त्याच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

'डॉ. आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलंय, दलित समाजाला आता त्यांचं भावनिक भाषण नकोय'; समरजित घाटगेंचा हल्ला

SCROLL FOR NEXT