World Cup 2023 Tickets BCCI ICC : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या सामन्यांची तिकीट विक्री शुक्रवारी 25 ऑगस्टपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी भारताव्यतिरिक्त इतर देशांच्या सामन्यांची तिकीट विक्री सुरू करण्यात आली होती. मात्र तरी देखील फॅन्सच्या तिकीट विक्री करणाऱ्या अॅप आणि वेबसाईटवर चांगल्याच उड्या पडल्या.
अॅप आणि साईटवर प्रचंड ट्रॅफिक आल्यामुळे ते जवळपास 30 ते 40 मिनिटे क्रॅश झाले होते. यामुळे क्रिकेट प्रेमींना तिकीट खरेदी करताना खूप त्रासाचा सामना करावा लागला. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून शेखी मिरवते मात्र त्याला त्यांना भारताव्यतिरिक्तच्या सामन्यासाठीची तिकीट विक्री करणे झेपले नाही.
30 ऑगस्टपासून भारताचे सराव सामने आणि 31 ऑगस्टपासून भारताच्या मुख्य सामन्यांची तिकीट विक्री सुरू होणार आहे. यावेळी काय हाल होतील याची कल्पनाच केलेली बरी.
गुवाहाटी आणि तुरूवअनंतपुरम येथे होणाऱ्या भारताच्या सराव सामन्यांची तिकीट विक्री ही 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्टला चेन्नई, दिल्ली आणि पुणे येथील भारताच्या सामन्यांची तिकीट विक्री होईल.
चेन्नईत 8 ऑक्टोबरला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना होणार आहे. 11 ऑक्टोबरला दिल्लीत भारत विरूद्ध अफगाणिस्तान सामना होईल. 19 ऑक्टोबरला पुण्यात भारत विरूद्ध बांगलादेश सामना होईल.
याचबरोबर 1 सप्टेंबरपासून धर्मशाळा, लखनौ आणि मुंबई येथील सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरू होईल. 2 सप्टेंबरला बंगळुरू आणि कोलकाता येथील सामन्यांची तिकीट विक्री सुरू होईल.
भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची तिकीट विक्री ही खूप उशिरा सुरू झाली आहे. आधीच पाकिस्तानने नखरे केल्याने वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशील झाला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर झालेल्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले. यामुळे तिकीट विक्री सुरू करण्यास उशीर झाला. यामुळे क्रिकेट चाहते आणि आयसीसी देखील बीसीसीआयवर नाराज झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.