World Cup 2023 Tickets esakal
क्रीडा

World Cup 2023 Tickets : वर्ल्डकप सामन्यांसाठी तिकीट बूक करणार आहात... ही बातमी तुमच्यासाठी

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Tickets : आयसीसीने भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे सुधारित वेळापत्रक आज (दि. 9) जाहीर केले. बीसीसीआयला सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल 9 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करावा लागला. यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याचा देखील समावेश आहे. आधी हा सामना 15 ऑक्टोबरला होणार होता. आता हा सामना एक दिवस आधी म्हणजे 14 ऑक्टोबरला होईल.

याचबरोबर बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपची तिकीट विक्री कधी सुरू होणार याबाबत देखील माहिती दिली आहे. 15 ऑगस्टपासून क्रिकेट चाहते वर्ल्डकप सामन्यांची तिकीटे बूक करू शकणार आहेत. यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा देखील समावेश आहे. (ICC ODI World Cup 2023 Tickets Booking Date)

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 चे तिकीट बूक करण्यापूर्वी चाहत्यांना https://www.cricketworldcup.com/register या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी 15 ऑगस्टपासून सुरू होईल. यामुळे तुम्हाला तिकीट विक्रीबाबतची माहिती आधी या वेबसाईटमार्फत मिळणार आहे. याचा फायदा तुम्हाला वर्ल्डकप सामना पाहण्यासाठी आपली स्टेडियममधील जागा निश्चित करण्यासाठी होणार आहे.

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात वर्ल्डकपचे सामने आयोजित करणाऱ्या राज्य संघटनांच्या तिकीट विक्री रणनितीला मान्यता दिली आहे. मात्र फक्त क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने इडन गार्डनवरील होणाऱ्या वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांचे दर जाहीर केले आहेत.

बीसीसीआयने आधीच घोषणा केल्याप्रमाणे वर्ल्डकपची इ - तिकीटे मिळणार नाहीयेत. चाहत्यांना स्टेडियममधील तिकीट खिडकीवर प्रत्यक्ष जाऊन तिकीट घ्यावं लागणार आहे.

बीसीसीआयने आधी तिकीट आरक्षित करणाऱ्या चाहत्यांना तिकीटाची हार्ड कॉपी पाठवण्याची जबाबदारी ही तिकीट विक्री पार्टनर बूक माय शो आणि पेटीयम यांच्यावरच सोपवली आहे.

याचबरोबर बीसीसीआयने प्रत्येक सामन्यातील 300 फ्री हॉस्पिटॅलिटी तिकीटे आपल्याकडे ठेवली आहेत. आयोजकांना आयसीसीसाठी लीग स्टेजमधील 1295 तिकीटे आरक्षित ठेवावी लागणार आहे. तर भारताविरूद्धचे सामने आणि सेमी फायनलची मिळून 1355 तिकीटे आयसीसीला द्यावी लागणार आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT