World Cup 2023: यंदाचा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतात विश्वचषकाची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी भारतात येणार आहे. विश्वचषकाच्या एका महत्वाच्या क्षणाचा भाग होण्याची आणि त्या क्षणाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना मिळाली आहे.
मंगळवारी (दि. २६ सप्टेंबर) विश्वचषकाच्या ट्रॉफीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत जी बस वापरण्यात येणार आहे, त्या बसचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वरच्या बाजूने खुली असणाऱ्या या बसचा वापर ट्रॉफीच्या मिरवणुकीमध्ये केला जाणार आहे.
ही बस निळ्या रंगाची असून यावर आयोजक देश म्हणून भारताचा झेंडा देखील लावण्यात आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली की पुण्यातील जे.डब्ल्यू मॅरेट हॉटेलपासून ही मिरवणूक सुरु होणार असून कृषी महाविद्यालय, पुणेच्या मैदानावर ही ट्रॉफी सर्वांसमोर प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. २०११च्या विश्वचषकानंतर ही ट्रॉफी पुण्यात येत असल्याने चाहत्यांमधील उत्साह वाढला आहे.
भारतात येण्यापुर्वी ही ट्रॉफी १८ देशांमध्ये फिरवण्यात आली आहे. फ्रान्स, इटली, बहरीन,नायजेरिया, युगांडा, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये ही ट्रॉफी फिरवण्यात आली होती. विश्वचषक २०२३ची ट्रॉफी इतर देशांमध्ये फिरवण्याला २७ जुलैला सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर हा दौरा ४ सप्टेंबरला संपल्यानंतर या ट्रॉफीचं भारतात आगमन झालं. (Latest Marathi news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.