World Cup Archery esakal
क्रीडा

World Cup Archery : विश्वकरंडक तिरंदाजीत ज्योती-आदिती-परनीतने इतिहास घडवला; भारतीय महिलांची सुवर्ण हॅट्ट्रिक

अनिरुद्ध संकपाळ

World Cup Archery India Women : जागतिक तिरंदाजीतील कंपाऊंड प्रकारात अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक केली. ज्योती सुरेखा, आदिती स्वामी आणि परनीत कौर या त्रिमूर्तींनी हा इतिहास घडवला.

तुर्कस्थान येथे झालेल्या या विश्वकरंडक तिरंदाजी (स्टेज ३) स्पर्धेत ज्योती-आदिती-परनीत या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित इस्तोनिया संघाचा २३२-२२९ असा पराभव केला. २०२४ मधील ही तिसरी विश्वकरंडक स्पर्धा आहे. यंदाच्या वर्षात शांघाय आणि येंचॉन येथे झालेल्या स्पर्धेतही भारतीय महिला संघाने सुवर्णपदकाचा सन्मान मिळवला होता.

तुर्कस्थान येथे आज स्पर्धेचा तिसरा टप्पा (स्टेड ३) पार पडला. भारताच्या या महिला संघाला पहिल्या फेरीत केवळ १० संघ असल्यामुळे पुढे चाल मिळाली. त्यानंतर अंतिम फेरी गाठताना त्यांनी अल साल्वादोर संघावर २३५-२२७ आणि तुर्कस्थानचा २३४-२२७ असा पराभव केला.

एकीकडे महिलांचा संघ इतिहास घडवत असताना क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापासून थोडक्यात हुकला. प्रियांश, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश फुगे यांची उपांत्य सामन्यात तुर्कस्थानकडून शूटऑफमध्ये हार झाली. दोन्ही संघांची २३६-२३६ अशी बरोबरी झाली होती, पण शूटऑफमध्ये भारतीय संघ ३०*-३० असे थोडक्यात मागे पडला.

त्यानंतर ब्राँझपदकासाठी झालेल्या सामन्यातही भारताच्या या पुरुष संघाला फ्रान्सकडून २३५-२३६ अशा निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT