World Cup final 2022 AUSW VS ENGW Mitchell Starc standing ovation as wife Alyssa Healy World record Brek century  
क्रीडा

CWC बायकोचा वर्ल्ड रेकॉर्ड; स्टार्कचा जगभरातील नवरोबांना खास संदेश

वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली अ‍ॅलिसा हिलीची बॅट पुन्हा एकदा तळपली.

Kiran Mahanavar

Women World Cup 2022 : स्फोटक बॅटर म्हणून प्रसिद्ध असलेली एलिसा हिलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एलिसा हिलीने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिच्या 137 चेंडूतील 170 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 356 धावांपर्यंत मजल मारली. एलिसाने वर्ल्ड कपमधील सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केलीये. याआधी वेस्ट इंडीज विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये तिने शतकी खेळी साकारली होती. गतवर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही ती संघाचा भाग होती. भारतीय महिला संघाने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला बाद केले होते. या सामन्यातही तिने 75 धावांची खेळी केली होती. तिची दमदार खेळी आणि इतर बॅटरनं दिलेली उत्तम साथ यामुळे सहावेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. हिली तसेच ऑस्ट्रेलियन संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मिचेल स्टार्कही स्टँडमध्ये बसला होता. स्टार्क हा ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज आहे.

क्राइस्टचर्च येथील ओव्हल स्टेडीयमध्ये मिचेल स्टार्क खेळाचा आनंद घेत असल्याचे कॅमेऱ्यावर अनेक वेळा दिसून आले. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत त्यांचा सहभाग होता. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 1-0 अशी जिंकली.

मिचेल स्टार्कने अ‍ॅलिसा हिलीला पाठिंबा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. स्टार्कने हिलीला पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये, त्याने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली कारण तो महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हिलीला पाठिंबा देण्यासाठी आला होता. त्या सामन्यात हिलीने अवघ्या 39 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. हिलीने २०२२ च्या विश्वचषकात नऊ सामन्यांमध्ये ५०९ धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ५६.५५ होती. यासोबतच स्ट्राइक रेटही १०३ च्या वर आहे. २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.

स्टार्कची कृती जगभरातील नवरोबांसाठी खास संदेशच

बायकोला आनंदी ठेवण्याचा जमाना आता मागे पडलाय. महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. आताचा जमाना तिला सपोर्ट करण्याचा आहे. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप दरम्यान हाच संदेश मिशेल स्टार्कने दिलाय. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील बायकोची फायनल पाहण्यासाठी तो स्टेडियममध्ये उपस्थितीत राहिला. तिच्या प्रत्येक फटक्यावर त्याचा आनंद पाहण्याजोगा होतो. बायकोनं वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर स्टार्कने स्टँडमध्ये उभे राहत टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले. या कृतीतून त्याने जगातील नवरोबांना आपल्या पत्नीला सपोर्ट करण्याचा एक सामाजिक संदेशच दिल्यासारखे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Press Conference: ठाकरेंना पराभवाचा धक्का! त्यातच अजित पवारांनी जखमेवर मीठ चोळलं, पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

NCP Manoj Kayande Won Sindkhed Raja Election 2024 final result live : 'सिंदखेड राजा'त मनोज कायंदे ठरले 'राजा'? शिंगणेंचा पराभव

Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : परंडा मतदारसंघातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत 1510 मतांनी विजयी

Amgaon Assembly Election Results 2024 : आमगाव मतदारसंघात भाजपने गड राखला! संजय पुरम 110123 बहुमताने विजयी

SCROLL FOR NEXT