क्रीडा

World Cup: देवमाणूस ! विराटचं ४८वं शतक तर झालं पण, अंपायरचं सर्वत्र का होतय कौतुक?

Virat Kohli 48th Century:भारत विरुद्ध बांग्लादेश या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील ४८व शतक पूर्ण केलं.

Manoj Bhalerao

Umpire Richard Kettleborough:भारत आणि बांग्लादेश संघात विश्वचषक स्पर्धेतील एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने बांग्लादेशचा ७ गडी राखून पराभव केला. यात भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. हा सामना विराट कोहली चाहत्यांसाठी लक्षणीय ठरला. कारण, सामन्यात विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील ४८वं शतक पूर्ण केलं. विराटने शतक झळकवल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव केला जातोय.

एका बाजूला विराटला शतकापर्यंत पोहोचवण्यात काही प्रमाणात केएल राहुलनं संयम राखत आणि विराटला धावा करण्याची संधी देत प्रेक्षकांची मनं जिंकली.तर दुसऱ्या बाजूला असा एक व्यक्ती आहे, जो भारतासाठी खेळतच नव्हता, पण त्यालाही कदाचित वाटल असेल की विराटच शतक व्हायला पाहिजे.

विराटला शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या काही धावा बाकी असताना गोलंदाज नसूम याने विराटच्या पायाच्या दिशेने टाकला, जो की मागच्या दिशेने यष्टीरक्षक मुश्फिकुरच्या हातात गेला. सर्वांना वाटलं की पंच आता वाईडचा इशारा करतील. मात्र, पंच रिचर्ड केटलबर्ग यांनी चेंडू वैध ठरवला आणि विराटला धाव करण्यास मदत झाली.

हा सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर पंच रिचर्ड केटलबर्ग यांच्या निर्णयाची प्रशंसा करण्यात आली. सर्वांनी विराटच्या शतकात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पण कदाचित त्यांनी वाटलं असावं की विराटच्या पायाच्या दिशेने जाणारा चेंडू विराटच्या पायावर आदळला असता. पण विराट शफल करुन पुढे आला आणि चेंडू मागे गेला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT