World Cup Pakistan players No fitness Tests : भारतीय संघाकडून पाकिस्तानी संघाला सात विकेट राखून पराभवाला सामोरे जावे लागले. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फिटनेस टेस्ट होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या अभावामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर सपाटून मार खावा लागत आहे.
मिसबाह उल हक जेव्हा प्रशिक्षक व निवड समितीत होता, तेव्हा त्याच्याकडून खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष दिले जात होते. खेळाडूंच्या फिटनेस टेस्ट होत होत्या. व्यावसायिक क्रिकेटपटू असल्यानंतर किमान एका महिन्यानंतर फिटनेस टेस्ट व्हायला हवी. तंदुरुस्तीकडे लक्ष दिले नाही, तर तुम्हाला वाईट पराभवाला जावे लागते, असे वसीम यांनी पुढे स्पष्ट केले.
पाकिस्तान क्रिकेट मंडळात गेल्या तीन वर्षांमध्ये तीन चेअरमन बदलण्यात आले. याचमुळे खेळाडू व व्यवस्थापन यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढल्या मालिकेसाठी आम्ही संघात असू की नाही याबाबत चिंता सतावू लागते. तीच परिस्थिती खेळाडू व व्यवस्थापनाची झालेली आहे, असे वसीम आवर्जून सांगतात.
पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या लढतीत २ बाद १५४ धावा अशा सुस्थितीत होता, पण त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. पाकिस्तानचा डाव १९१ धावांवरच आटोपला. ही मोठी निराशा आहे. भारतीय संघाने माफक आव्हान सहज ओलांडले.
— वसीम अक्रम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.