World Test Championship 2023 and 2025 Final Will Be Played On Lords Cricket Ground ICC IBC Approve  esakal
क्रीडा

WTC Final : मक्तेदारी! 2023 अन् 2025 ची फायनल देखील लॉर्ड्सवरच

अनिरुद्ध संकपाळ

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) 2023 आणि 2025 ची फायनल ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवरच (Lords Cricket Ground) खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने (ICC) 'आंतरराष्ट्रीय बोर्ड ऑफ काऊन्सिलने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची 2023 आणि 2025 ची फायनल लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर आयोजित करण्याला परवानगी दिली आहे.' असे प्रसिद्धी पत्रकात सांगितले. हे पत्रक आयसीसीने मंगळवारी प्रसिद्ध केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 ची फायनल देखील लॉर्ड्सवरच खेळवण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे हा सामना साऊथहाम्पटनच्या आगाज् बाऊलमध्ये खेळवण्यात आली. हा सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात झाला होता. न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. आयसीसी बोर्डने महिला आणि पुरूष क्रिकेटच्या 2023 ते 2027 फ्युचर टूर प्लॅनिंगला (FTP) देखील मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसात हे FTP देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात डॅनियल व्हिटोरी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची आयसीसी पुरूष क्रिकेट समितीवर नियुक्ती देखील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रॉजर हार्पर आणि महेला जयवर्धने देखील या समितीवर निवडले गेले आहेत. आयसीसी बोर्डाने पुढची आयसीसी चेअरमन (ICC Chairman) निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यास देखील परवानगी दिली आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होईल. ही निवड बहुमताद्वारे करण्यात येणार आहे. नव्या आयसीसी चेअरमनचा कालावधी 1 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT