कोरोना काळात आयपीएल स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात अपयशी ठरलेल्या बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी मोठी तयारी केली आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC) खेळणार आहे. याशिवाय टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. देशातील कोरोनाच्या (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची घरीच कोरोना टेस्ट घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने घेतलाय. इंग्लंड रवाना होण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होण्यापूर्वी निवड झालेल्या सर्व खेळाडूंच्या घरीच तीन टेस्ट होणार आहेत. (world test championship final 3 covid 19 tests at home before team india players come mumbai says bcci)
एएनआयने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, 19 मे रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी संघातील सर्व खेळाडू मुंबईमध्ये एकत्र येणार आहेत. याठिकाणी येण्यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूंची त्याच्या घरी आरटी-पीसीआर टेस्ट (Covid 19 RT PCR Test) करण्यात येईल. तीन टेस्टनंतरच त्याला मुंबईला जाता येईल.
2 जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. यापूर्वी सर्व खेळाडूंना 14 दिवसांच्या क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागेल. इंग्लंड दौऱ्यावर निवड झालेल्या जवळपास सर्वच खेळाडूंनी कोरोनाचा पहिला डोस घेतला असून दुसरा डोस ते इंग्लंडमध्येही घेऊ शकतात.
18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमधील साउथहॅम्पटनच्या मैदानात में भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची लढत होणार आहे. पहिल्या फायनलमध्ये कोण किंग ठरणार याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ही मालिका रंगणार आहे. बीसीसीआयने इंग्लंडच्या मोठ्या दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली असून रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांनी कमबॅक केले आहे. अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नगवासवाला हे राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असतील. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा वेटिंगवर आहेत. फिटनेसनंतरच त्यांच्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.