क्रीडा

WTC Final : तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

नामदेव कुंभार

विश्व कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पुढील महिन्यात होणार आहे. कसोटी क्रमवारीतील अव्वल दोन संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. आक्रमक विराट कोहलीच्या विरोधात संयमी केन विल्यमसन याचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर दोन जून रोजी भारतीय संघ चार्टेड प्लेनने रवाना होणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी क्रीडा प्रेमींच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलं आहे. पण आयसीसीनं या सर्वांची उत्तरे दिली आहेत.... संपूर्ण क्रीडा विश्वाचं या सामन्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे आयसीसीनं आपल्या काही नियमात माफक बदल केले आहेत. दोन्ही संघाना समान संधी मिळावी आणि खेळही पूर्ण व्हावा, यासाठीआयसीसीने कोणतेही बारकावे सोडले नाहीत.... (World Test Championship Final playing conditions announced)

WTC Final कधी आणि कुठे?

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात होणारा विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून यादरम्यान होणार आहे. इंग्लंडमधील साउथम्प्टन स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.

कोणत्या चेंडूचा वापर केला जाणार?

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना तटस्थ ठिकाणी खेळवला जाणार आहे. त्याप्रमाणे या सामन्यासाठी वापरण्यात येणारा चेंडूही वेगळा असेल. दोन्ही संघाने आतापर्यंत न वापरलेला चेंडू या सामन्यासाठी वापरण्यात येणार आहे. न्यूझीलंडचा संघ कुकाबुरा, तर भारतात एसजी बनावटीचे चेंडू वापरतात. मात्र, अंतिम सामन्यासाठी ड्यूक चेंडूचा वापर केला जाणार आहे. ड्यूक चेंडूचा वापर इंग्लंडचा संघ करतो. अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड इंग्लंडबरोबर दोन सामन्याची मालिका खेळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडला ड्यूक चेंडूचा फायदा मिळू शकतो.

कोणत्याही परिस्थिती निकाल लागला नाही तर विजेता कोण?

राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, त्याचा उपयोग वाया गेलेला खेळ पूर्ण करण्यासाठी असेल, तरिही सामन्याचा निकाल लागला नाही, तर भारत आणि न्यूझीलंड संघला संयुक्त विजेतेपद दिलं जाईल.

राखीव दिवसाचे नियम काय?

पाऊस अथवा अंधूक प्रकाशाचा व्यत्यय आला, तर वाया गेलेल्या खेळाची भरपाई त्याच दिवशी अर्ध्या तासाचा खेळ वाढवून केली जाईल. त्या दिवशी ही भरपाई शक्य झाली नाही, तर पुढच्या दिवशी अर्धा तास आधी खेळाला सुरुवात केली जाईल. तरिही भरपाई झाली नाही, तर त्याच दिवशी अर्धा तास उशीरापर्यंत खेळ चालेल. पाचही दिवसात वाया गेलेल्या खेळाची भरपाई करता आलीच नाही, आणि सामना अनिर्णित राहिला. तर राखीव (सहाव्या)दिवसाचा वापर केला जाईल. पण खेळ वाया न जाता पाचही दिवस खेळून जर निकाल लागलत नसेल, तर मात्र राखीव दिवसाचा वापर करण्यात येणार नाही. 23 जून 2021 हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

शॉर्ट धावच्या नियमात काही बदल? -

एखाद्या फलंदाजाने शॉर्ट धाव घेतली, तर मैदानातील पंच टीव्ही पंचाकडे रिव्ह्यूची मागणी करेल. त्या निर्णायनंतरच पुढील चेंडू फेकला जाईल.

डीआरएस नियमांत बदल ?

होय, डीआरएस नियमांत बदल करण्यात आला आहे. पायचीत डीआरएस रिव्ह्यू घेताना प्रतिस्पर्धी कर्णधाराला पंचची मदत घेता येईल. फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता का? अशी विचारणा प्रतिस्पर्धी कर्णधार पंचाकडे करु शकतो. पंचाच्या सल्ल्यानंतर पायचीतबाबत डीआरएस घेऊ शकतो.

अंपायर्स कॉलमध्ये बदल?

पायचीतच्या निकालात विकेट झोन, चेंडू यष्टींच्या कितीवर किंवा किती बाजूला लागतो, यावर अंपार्यस कॉल ठरत असतो. पण यावळी विकेट झोनचे अंतर काढून टाकण्यात आलं आहे.

विजेत्याला किती रक्कम मिळणार?

विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेवर नाव कोरल्यानंतर विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम लवकरच निश्चितपणे जाहीर केली जाईल. 2019 विश्वचषक विजेत्या इंग्लंड संगाला US$ 4 million मिळाले होते. तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला विजेत्यापेक्षा अर्धी रक्कम देण्यात आली होती. उपांत्यफेरीत पोहचलेल्या संघाना US$ 800,000 मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT