WPL 2023 Final Teams : महिला प्रीमियर लीगचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गट टप्प्यातील शेवटचा सामना मंगळवारी म्हणजे आज खेळल्या जाणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे तर आरसीबी आणि गुजरात जायंट्सचा प्रवास संपला आहे. गुणतालिकेत प्रथम क्रमांकाचा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
गुणतालिकेत प्रथम क्रमांकाचा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर इतर 2 संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एलिमिनेटर सामने खेळल्या जातील. 24 तारखेला एलिमिनेटर आणि 26 मार्चला अंतिम सामना खेळल्या जाणार आहे.
मुंबई इंडियन्सचा आज सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे, आरसीबी आधीच स्पर्धेतून बाहेर गेली आहे. जर मुंबईने सामना जिंकला तर त्याची नजर दिल्ली विरुद्ध यूपी सामन्यावर असेल.
मुंबईच्या विजयाने यूपी नंबर 1 होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडेल. मुंबईचे सध्या 7 सामन्यांत 10 गुण आहेत, ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.
पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर आहे, त्यांचेही 7 सामन्यात 10 गुण आहेत पण त्यांचा निव्वळ धावगती मुंबईपेक्षा चांगला आहे.
मुंबईने आपला सामना गमावला तर यूपीविरुद्धचा हा सामना जिंकून दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर जाईल आणि थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.
मुंबईनेही त्यांचा सामना जिंकला आणि दिल्ली कॅपिटल्सनेही त्यांचा सामना जिंकला तर नेट रन रेट अंतिम फेरीतील संघ ठरवेल.
यूपी पहिल्या क्रमांकावर जाईल याची शक्यता कमी आहे. यूपी वॉरियर्सचे सध्या 7 सामन्यांतून 8 गुण आहेत.
मुंबईने आपला सामना गमावला, यूपीने दिल्लीलाही हरवले, तर प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या सर्व संघांना 10 गुण मिळतील.
पण यूपीचा नेट रनरेटमधील फरक खूप जास्त आहे, त्यामुळे त्याची पॉइंट टेबलमध्ये प्रथम येण्याची शक्यता नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.