Wrestler Ravi Kumar Dahiya wins gold Sakal
क्रीडा

ऑलिम्पिक मेडलिस्ट रविला गोल्ड; अखेरच्या क्षणी मारली मुसंडी!

सकाळ डिजिटल टीम

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकवलेल्या रवि दाहियानं कुस्तीच्या आखाड्यात दमदार कमबॅक केले आहे. 24 वर्षीय दहियानं इस्तांबुल येथील यासर डोगू रँकिंग सीरिज स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली आहे. 61 किलो वजनी गटात त्याने उज्बेकिस्तानच्या गुलोमजोन अब्दुल्लाव याला 11-10 अशा फरकाने पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले. (Wrestler Ravi Kumar Dahiya wins gold at Yasar Dogu 2022)

दोन्ही पैलवानामधील फायनल लढत अटितटिची झाल्याचे पाहायला मिळाले. फायनल बाजी मारण्यासाठी रवि दाहियाला चांगलाच संघर्ष करावा लागला. अब्दुल्लाव विरुद्धच्या लढतीत रवि दाहिया 8-10 असे पिछाडीवर होता. अखेरच्या क्षणाला त्याने जबरदस्त डाव खेळत बाजी आपल्या बाजून पलटली. सेमीफायनलमध्ये त्याने इराणच्या मोहम्मद बाघेर इस्माईल यखकेशी याला पराभूत केले होते.

याशिवाय अन्य लढतीमध्ये दीपक पुनियाने 92 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. त्याने कझाकिस्तानच्या एलखान असदोवला 7-1 असे पराभूत केले अमन याने 57 किलो वजनी गटात तर ज्ञानेंद्र याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली.

मागील वर्षी टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रवि दहियाने लक्षवेधी कामगिरी केली होती. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा तो दुसरा पैलवान ठरला होता. फायनलमध्ये 57 किलो वजनी गटात त्याची लढत विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन जावुर उगुएव याच्याविरुद्द झाली होती. यात त्याला 4-7 अशा पराभवाला समोरे जावे लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT