Vinesh Phogat out of Asian Games 2023 
क्रीडा

Vinesh Phogat : आशियाई स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार कुस्तीपटू विनेश फोगट स्पर्धेतून बाहेर

Kiran Mahanavar

Vinesh Phogat out of Asian Games 2023 : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशियाई खेळ 2023 मधून बाहेर पडली आहे. फोगटने मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. 17 ऑगस्टला त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

त्याच्या जागी ज्युनियर विश्वविजेता आता अंतिम पंघल आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 53 किलो गटात भाग घेईल. विनेशने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशला थेट प्रवेश मिळाला होता. यासाठी तिला कोणत्याही चाचणीतून जावे लागले नाही.

विनेश फोगटने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 17 ऑगस्टला माझ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कायम ठेवण्याचे माझे स्वप्न होते, जे मी 2018 मध्ये जकार्ता येथे जिंकले होते. पण दुर्दैवाने या दुखापतीमुळे मी यात सहभागी होऊ शकणार नाही. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे, यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत कळवले आहे. मी माझ्या चाहत्यांना माझे समर्थन करत राहण्याचे आवाहन करते, जेणेकरून मी लवकरच पुनरागमन करेल आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करू शकेल.

विनेश फोगट ही केवळ आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेती नाही, तर राष्ट्रकुल स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारी आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक विजेती आहे. 19 वर्षांच्या पंघलबद्दल बोलायचे तर, ती भारताची पहिली अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियन आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील चाचण्यांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT