Wrestlers Protest 1983 World Cup winning cricket team  esakal
क्रीडा

Wrestlers Protest : घाईत कोणताही निर्णय घेऊ नका... महिला कुस्तीपटूंना 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

Wrestlers Protest 1983 World Cup winning cricket team : ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांना अजून अटक होत नाही म्हटल्यावर या कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत प्रवाहित करण्याचा इशारा दिला होता. या घटनेनंतर भारतातील अनेक दिग्गज व्यक्तींनी आपले मत व्यक्त केले.

आता 1983 चा क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील सदस्यांनी महिला कुस्तीपटूंना सल्ला दिला आहे. त्यांनी कुस्तीपटूंनी कोणताही वेगळा निर्णय घेऊ नये अशी विनंती केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 1983 चा क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील सदस्यांनी वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. त्यात ते म्हणतात की, 'महिला कुस्तीपटूंचे आंदोलन ज्या प्रकारे हाताळले गेले त्यावरून आम्ही खूप अस्वस्थ आहोत. याचबरोबर कुस्तीपटूंनी त्यांचे कमावलेली पदके गंगेत प्रवाहित करण्याबाबत विचार केला याबाबत देखील आम्हाला चिंता वाटते.'

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू म्हणतात की, 'तुम्हाला ही पदके मिळवण्यासाठी अनेक वर्षे कष्ट करावे लागलेत. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला आहे. ती पदके देशाची शान आणि आनंद आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रकरणात घाईत निर्णय घेऊ नका. आम्ही आशा करतो की तुमची तक्रार ऐकून घेतली जाईल आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल. कायद्याचं राज्य अबाधित राहू दे.'

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 ला जिंकलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये सुनिल गावसकर, मोहिंदर अमरनाथ, के श्रीकांत, सईद किरमाणी, यशपाल शर्मा, मदन लाल, बलविंदर सिंग संधू, संदीप पाटील, किर्ती आझाद आणि रॉजर बिन्नी यांचा समावेश होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT