Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest esakal
क्रीडा

Wrestlers Protest : बृजभूषण यांनी देशातील कुस्ती खेळाडूंवर अन्याय केलाय ; योगेश्वर दत्त

योगेश्वर दत्तचा आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना सल्ला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी देशातील कुस्ती खेळाडूंवर अन्याय केला आहे; तसेच त्यांनी अनेक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केले असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीकरिता देशातील आघाडीच्या कुस्ती खेळाडूंनी नवी दिल्लीमधील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे.

मात्र बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून आता आंदोलन करणाऱ्या खेळाडूंनी सरावावर आणि खेळाकडे लक्ष द्यावे, असे मत भारताचा लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेता योगेश्वर दत्त याने व्यक्त केले आहे.

योगेश्वर दत्त हा भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निर्माण केलेल्या सात जणांच्या समितीचा सदस्य आहे. कुस्ती खेळाडूंच्या आंदोलना बाबतीत मत व्यक्त करताना योगेश्वर दत्त म्हणाला, ‘बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीमध्ये शुक्रवारी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

त्यामुळे खेळाडूंनी आता आगामी स्पर्धेसाठी सरावावर आणि खेळावर लक्ष द्यावे. भारतात स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा दोषींना शिक्षा देऊ शकत नाहीत. आपल्या देशात गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे काम हे न्यायव्यवस्थाच करत असते.

देशाच्या क्रीडामंत्र्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीचे दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आपला अहवाल देणे, हेच काम असून आंदोलन करणाऱ्या कुस्ती खेळाडूंनी तीन महिने आधीच बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करायला हवा होता.’’

भारतातील सध्या आघाडीचे कुस्ती खेळाडू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत.

आयओएकडे यायला हवे होते

मागच्याच आठवड्यात भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्ती खेळाडूंवर निशाणा साधला होता. आंदोलन करणाऱ्या कुस्ती खेळाडूंनी दिल्लीमध्ये ठाण मांडण्याच्या आधी आमच्याकडे म्हणजेच आयओएकडे यायला हवे होते. आयओएची लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती आहे; मात्र खेळाडू आंदोलनावरच ठाम राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT