Wrestlers Protest New Parliament Building Inauguration : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आत ट्विट करून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कुस्तीपटूंना पाठिंबा देण्याची मागणी केली. दिल्लीच्या जंतर मंतरवर भारतीय महिलाकुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. या इमारतीसमोरच भारतीय महिला कुस्तीपटू आंदोलन करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.
दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी भारताच्या कन्या वेदनेत असताना पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत यावर प्रश्न विचारला. महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
साक्षी मलिकने ट्विट केले की, 'मी सर्व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंना सांगू इच्छिते की आमचे पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत. मात्र दुसरीकडे आमच्या समर्थकांना अटक केली जात आहे. लोकांना अटक करून आपण कसं काय म्हणू शकतो की ही लोकशाहीची जननी आहे. भारताच्या कन्या वेदनेत आहेत.'
दुसरीकडे विनेश फोगाट म्हणाली की, 'जंतर मंतरवर लोकशाहीची दिवसा ढवळ्या हत्या झाली आहे. एका बाजूला पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत. दुसरीकडे लोकांना अटक केली जात आहे.'
महिला कुस्तीपटू संसद भवनापासून काही किलोमिटर अंतरावरच जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांनी आज नवीन संसद भवनासमोर महिला महापंचायत भरवण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेल्या लोकांना अटक केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.