Wrestlers Protest Vinesh Phogat Anurag Thakur esakal
क्रीडा

Wrestlers Protest : कुस्तीपटूंनी वैयक्तिक अनुभव सांगितला.... विनेश फोगाटचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकुरांवर खळबळजनक आरोप

अनिरुद्ध संकपाळ

Wrestlers Protest Vinesh Phogat Anurag Thakur : भारताची पदक विजेती महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्याविरूद्ध केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. विनेश फोगाटने आज केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यावरच आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. विनेशने क्रीडामंत्र्यांनी पुन्हा एकदा समिती स्थापन करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

विनेश फोगाट म्हणाली की, '2012 मध्ये राष्ट्रीय शिबीर सुरू होते. त्यावेळी महिला कुस्तीपटूंनी पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र 24 तासात ती केस दाबण्यात आली. 2014 मध्ये गीता फोगाटचे फिजिओ जे तिचे ट्रेनरही होते. त्यांनी देखील याच प्रकारची तक्रार केली होती. त्यांना कॅम्पमधून 24 तासात काढून टाकण्यात आले. तेव्हापासून तिच्या पत्नीने कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नाही.

विनेश फोगाट पुढे म्हणाली की, 'आम्ही आमचे आंदोलन सुरू करण्यापूर्वी तीन महिने आधी आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण कशा प्रकारे केले जाते, त्यांना मानसिकदृष्ट्या कसे छळले जाते याबाबत सर्व सांगितले होते. खेळाडूंना अशा परिस्थितीत ढकलले जाते की ते आपल्या जीवाचे काही बरेवाईट करून घेऊ शकतात.'

'आम्ही तीन चार महिने वाट पाहिली काहीच होत नाही म्हटल्यावर आम्ही जंतर मंतरवर आलो. ज्यावेळी आम्ही क्रीडा मंत्र्यांशी भेटलो त्यावेळी कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराबाबतच त्यांचा वैयक्तिक अनुभव त्यांना सांगितला. मुली त्यांच्यासमोर रडल्या देखील मात्र त्यावेळी देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.'

'क्रीडा मंत्र्यांनी समिती स्थापन करत हे प्रकरण दाबण्याचाच प्रकार केला. आम्ही प्रत्येक पातळीवर हा विषय नेला. मात्र प्रत्येकवेळी लैंगिक अत्याचाराचा मुद्दा दाबण्यातच आला आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT