Brij Bhushan Wrestling Federation of India Election esakal
क्रीडा

Bajrang Punia : महिला कुस्तीपटूंना धोका... हा व्यक्ती जिंकला तर बृजभूषण जिंकला; बजरंग सराव सोडून भारतात परतला

अनिरुद्ध संकपाळ

Brij Bhushan Wrestling Federation of India Election : भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक चर्चेचा विषय झाली आहे. या निवडणुकीत मावळते अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले आहे. याबाबतची मागणी आंदोलक कुस्तीपटूंनी केंद्र सरकारकडे केली होती. (Wrestler Protest News)

मात्र निवडणुकीच्या रिंगणात संजय कुमार सिंह उतरल्याने टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने सरकारला इशारा दिला आहे. त्याने केंद्र सरकारने दिलेले वचन पाळावे असे आवाहन केले. (Bajrang Punia Wrestling Practice)

बजरंग पुनिया द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला की, 'बृजभूषण शरण सिंहची जवळची व्यक्ती निवडणूक लढवत आहे. संजय कुमार सिंह भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. जर संजय कुमार निवडणूक जिंकले तर ती निवडणूक बृजभूषण शरण सिंह जिंकल्यासारखे आहे.'

'सरकारने आम्हाला वचन दिलं होतं की जे बृजभूषण यांच्या जवळचे आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील आहेत त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव केला जाईल. मात्र या प्रकरणात असं काही दिसत नाहीये.'

बजरंग पुनिया म्हणाला की, सरकारने त्यांचे वचन पाळले पाहिजे. नाहीतर महिला कुस्तीपटू सुरक्षित राहणार नाहीत. महिला कुस्तीपटू किती दिवस दहशतीखाली राहणार?

संजय सिंह हे उत्तर प्रदेश कुस्तीसंघाचे उपाध्यक्ष आहेत. बृजभूषण हे आपल्या मर्जीतील व्यक्तीला पदावर बसवून भारतीय कुस्ती महासंघावरील आपले नियंत्रण पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बजरंगने सराव अर्ध्यावर सोडला

2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या अनिता श्योरान या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. अनिता या बृजभूषण सिंह यांच्याविरूद्धच्या केसमध्ये साक्षीदार आहेत. त्यांना बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्यासह अजून दोन कुस्तीपटूंचे समर्थन आहे.

प्रत्येक विभागासाठी सर्वसंमतीने उमेदवार ठरवण्याचा विचार होता जेणेकरून निवडणूक टाळता आली असती. मंत्र जवळपास 20 ते 25 राज्य संघटनांनी बृजभूषण यांनी निवडलेल्या उमेदवारांना पाठिंवा दिला आहे.

बृजभूषण यांनी आपल्या पसंतीचे उमेदवार देत निवडणुकीतून माघार न घेतल्याचे संकेत दिले. त्यानंतर बजरंग पुनिया किर्गिस्तान येथील आपला सराव कमी करून भारतात परतला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT