vinesh phogat esakal
क्रीडा

Paris Olympic 2024 Vinesh Phogat: शाब्बास विनेश फोगाट! टोकियोतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला केले चीतपट

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Vinesh Phogat Live: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल नोंदवला. तिच्यासमोर पहिल्याच फेरीत टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीचे आव्हान होते. जपानच्या खेळाडूने २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु विनेशने उल्लेखनीय कामगिरी केली आणि ही मॅच ३-२ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. विनेश मागील अनेक महिने आखाड्याबाहेरच्या घडामोडींमुळे चर्चेत राहिली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषक सिंग यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप करताना विनेश अन्य कुस्तीपटूंसह आंदोलनाला बसली होती.

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वात कठीण ड्रॉ देण्यात आला होता. महिलांच्या ५० किलो वजनी गटात तिच्यासमोर पहिल्याच लढतीत अव्वल मानांकित युई सुसाकी हिचे आव्हान होते. सुसाकीने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे आणि विशेष म्हणजे मागील १४ वर्षांत तीन लढती गमावल्या आहेत. युई सुसाकी ही चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे आणि दोन वेळा आशियाई चॅम्पियन ठरली आहे.

विनेशने ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना ३-२ असा विजय मिळवला आणि जपानच्या खेळाडूला पराभूत केले. माजी ऑलिम्पिक विजेतीला पराभूत करून विनेशने पदकासाठी ती प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.

रेपेचेजचा पर्याय...

रेपेचेज लढतीतून कुस्तीपटूंना पदक जिंकण्याची दुसरी संधी मिळते. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन कुस्तीपटूंना रेपेचेज फेरीत कांस्यपदकासाठी खेळावे लागते. विनेश फायनलमध्ये पोहोचल्यास सुसाकीला रेपेचेज फेरीत खेळण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या खेळाडूकडून उप उपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या ४ खेळाडूंना कांस्यपदकाच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी मिळते. त्यानंतर रेपेचेज फेरीत उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडूंविरुद्ध त्यांचा सामना होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan International Airlines: सुधरा रे ! पाकिस्तानी विमान पेशावरऐवजी उतरले कराचीत, प्रवाशांनी घातला गोंधळ

ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाने वन-डे मधील पाकिस्तानच्या विक्रमाची लावली वाट; इंग्लंडविरुद्ध दिसला थाट

Supreme Court Youtube : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'असले' व्हिडिओ होत आहेत शेअर

Bhutan: हॅप्पी कंट्रीमध्ये बिटकॉइनची हवा! भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

SCROLL FOR NEXT