Wriddhiman saha withdraw his name from ranji trophy esakal
क्रीडा

वृद्धीमान साहाने टीम इंडियाच्या नव्या मॅनेजमेंटमुळे घेतला मोठा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: भारताचा अनुभवी विकेटकिपर वृद्धीमान साहाने (Wriddhiman saha) रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. साहाने हा निर्णय घेण्यामागे भारतीय संघाच्या नव्या मॅनेजमेंटचा (Team India New Management) एक निर्णय कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वृद्धीमान साहाने पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अभिषेक दालमिया आणि सह सचिव स्नेहशीष गांगुली यांना वैयक्तिक कारणाने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळणार नसल्याचे कळवले आहे. (Wriddhiman saha withdraw his name from ranji trophy)

भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या मॅनेजमेंटने निवडसमितीला आपल्या भविष्यातील योजनेबाबत माहिती दिली आहे. मॅनेजमेंटच्या भविष्यातील योजनेत 37 वर्षाच्या वृद्धीमान साहाचा समावेश नाही. त्यामुळे 4 मार्चपासून श्रीलंकेविरूद्धच्या (Sri Lanka) कसोटी मालिकेसाठी वृद्धीमान साहाची निवड होण्याची शक्यता नाही. टीम मॅनेजमेंटची आता ऋषभ पंतला (Rishabh Pant) सर्वात आधी पसंती असणार आहे. याचबरोबर न्यूझीलंड विरूद्धच्या कानपूर कसोटीत आंध्र प्रदेशच्या युवा कोना भरतने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता ऋषभ पंत आणि त्याचा बॅकअप तयार करण्यावर टीम मॅनेजमेंट लक्ष केंद्रीत करणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, टीम मॅनेजमेंटमधील प्रभावशाली लोकांनी वृद्धामान साहाला स्पष्टपणे सांगितले की ते आता पुढे जाणार आहेत. ते ऋषभ पंत बरोबरच काही नवे बॅक अप तयार करणार आहेत. त्यामुळे मॅनेजमेंटने सांगितले की श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड होणार नाही. कारण आता कोना श्रीकार भरतला (Kona Srikar Bharat) वरिष्ठ संघासोबत ठेवण्याची वेळ आली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले की याचमुळे वृद्धीमान साहाने पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनला सांगितले की तो रणजी ट्रॉफीचा हंगाम खेळणार नाही. त्यामुळेच बंगालच्या निवडसमितीने त्याची रणजी संघात निवड केली नाही.

वृद्धीमान साहाने भारताकडून 40 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 3 शतके ठोकत त्याने 1353 धावा केल्या आहेत. विकेट किपर म्हणून त्याने चांगली कामगिरी करत 104 विकेट घेण्यात मदत केली आहे. त्यात 92 कॅच आणि 12 स्टम्पिंगचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT