WTC 2023-25 Points Table After Aus vs Pak 2nd Test  
क्रीडा

WTC 2023-25 Points Table : पाकिस्तान तर खाली आलंच भारताचही टेन्शन वाढवलं, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवानं सगळं गणित बदललं

WTC 2023-25 Points Table After Aus vs Pak 2nd Test | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आयसीसीने स्लो ओव्हर रेटचा दंड आकारून भारताला दुहेरी झटका दिला

Kiran Mahanavar

WTC 2023-25 Points Table : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ या विजयासह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

त्याचवेळी या तीन सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानी संघाचे मोठे नुकसान झाले आहे. शान मसूदचा संघ सध्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आयसीसीने स्लो ओव्हर रेटचा दंड आकारून भारताला दुहेरी झटका दिला आहे. टीम इंडियाच्या स्लो ओव्हर रेटमुळे, दोन डब्ल्यूटीसी पॉइंट्स कमी झाले आहेत. ज्यामुळे भारत ताज्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये 6 व्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका या यादीत शीर्षस्थानी आहे. तर न्यूझीलंड काहीही न करता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीला सिडनीमध्ये खेळला जाणार आहे, तर त्याच दिवसापासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरचा शेवटचा कसोटी सामनाही खेळणार आहे. या दोन्ही सामन्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर मोठा प्रभाव पडणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास, चौथ्या दिवशी यजमानांनी पाकिस्तानसमोर 317 धावांचे लक्ष्य ठेवले होते, या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहुण्या संघ 237 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून शान मसूद आणि आगा सलमान यांनी अर्धशतके झळकावली. पॅट कमिन्सने दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे पंजे उघडले. या सामन्यात त्याने एकूण 10 विकेट घेतल्या आणि तो ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT