Poonam Pandey Twitter
क्रीडा

WTC : पूनम पांडेचं क्रिकेटसंदर्भात पुन्हा 'बोल्ड' वक्तव्य

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान मॉडेल पूनम पांडेच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान मॉडेल पूनम पांडेच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या पूनम पांडेला भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट फायनलसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पूनम पांडेन बोल्ड वक्तव्याची गूगली टाकली. टीम इंडिया जिंकली तर स्ट्रिपलेस (कपडे काढणे) होण्याचे वक्तव्य करु का? असा प्रतिप्रश्न तिने केले. (WTC Final Poonam Pandey Controversial And Bold Statement Say If India Wins I-Will Strip)

कोरोनामुळे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील स्पॉट बॉईज यांच्या रोजगारावर संकट कोसळले आहे. संकटात असणाऱ्या स्पॉट बॉईजच्या मदत करण्यासाठी पूनम पांडे पति सॅम बॉम्बेसोबत धान्य वाटप करताना दिसली. यावेळी क्रिकेट संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पूनमने आपल्या तोऱ्यात रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. ती म्हणाली की, क्रिकेट चालू आहे का? मला यासंदर्भात काही माहिती नाही. घरी गेल्यावर पाहते आणि मग वादग्रस्त भूमिका घ्यायची का ते ठरवते. यावेळी तिच्या पतीने पूनमला थांबवले. यावेळी टीम इंडिया जिंकली तर मी स्टिपलेस होतो, असे तो गंमतीने म्हणाला. यावर तू स्टिपलेस झालास तर टीम इंडिया जिंकणार नाही, असा टोलाही पूनम पांडेने लगावला.

2011 च्या वर्ल्ड कपवेळी पूनम पांडेने वादग्रस्त आणि बोल्ड वक्तव्य केले होते. भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला तर कपडे काढेन, असे ती म्हणाली होती. भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने परवानगी दिली नाही म्हणत तिने आपले इरादे बदलले होते. यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती.

इंग्लंडमधील साउदम्टनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना रंगला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणारा भारतीय संघ सध्या अडचणीत दिसतोय. त्याच्याशिवाय खराब हवामानाचाही या मेगा फायनलला फटका बसण्याची शक्यता आहे. पहिला दिवस पावासामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीही जवळपास 25 षटकांचा खेळ वाया गेला होता. एका बाजूला क्रिकेटच्या मैदानात पाऊस, अंधूक प्रकाश आणि भारत-न्यूझीलंड यांच्यात कोण जिंकणार? अशी चर्चा रंगत असताना क्रिकेट कनेक्शन कमेंटमुळे पूनम पांडेही चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT