WTC Final Rohit Sharma Toss  esakal
क्रीडा

WTC Final Rohit Sharma Toss : भारतीय फलंदाज उघडे पडू नयेत म्हणून प्रथम गोलंदाजी... माजी खेळाडूची रोहितवर बोचरी टीका?

अनिरुद्ध संकपाळ

WTC Final Rohit Sharma Toss : भारताचा कर्णधार रोहित शर्माने WTC Final मध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या तासाभरानंतर खेळपट्टी फलंदाजीला पोषक झाली अन् कांगारूंनी धावा करण्यास सुरूवात केली. पहिल्या सत्रात भारताला फक्त 2 विकेट्स घेता आल्या.

यानंतर रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनीयर यांनी तरी फलंदाजांना वाचवण्यासाठी हा निर्णय झाल्याचा दावा केला.

भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनीयर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, 'भारताने नाणेफेक जिंकली. त्यानंतर रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने मला आश्चर्य वाटले. मात्र मला असे वाटते की हा निर्णय आपल्या फलंदाजांना हिरव्या गार फ्रेश विकेटवर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या माऱ्याचा सामना करावा लागू नये म्हणून घेण्यात आला.'

फारूख इंजिनीयर पुढे म्हणाले की, 'मला आशा आहे की मोहम्मद शमी आणि सिराज प्रभावी ठरतील. रोहितचा हा खूप धाडसाचा निर्णय होता. भारतीय संघात चेतेश्वर पुजारा महत्वाची भुमिका बजावतो आहे. याचबरोबर विराट कोहली आणि शुभमन गिल यांचीही भुमिका मोठी आहे. आपल्याकडे चांगली फलंदाजी आहे.'

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला लंचपर्यंत दोन धक्के दिले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्राचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 73 धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर डेव्हिड वॉर्नरने 60 चेंडूत 43 धावा करत मार्नस लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. मार्नस 26 धावांवर नाबाद होता.

मोहम्मद शमीने लंचनंतर मार्नसला 26 धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर आलेल्या ट्रॅविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला 150 च्या जवळ पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT