WTC Point Table IND vs ENG esakal
क्रीडा

WTC Point Table IND vs ENG : एका पराभवानं संपूर्ण गणित बदललं; भारताची फायनलची वाट बिकट?

WTC Point Table IND vs ENG : भारताला पहिल्या सामन्यातील पराभव चांगलाच दमवणार आहे.

अनिरुद्ध संकपाळ

WTC Point Table India Vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. हैदराबाद येथील पहिल्या सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव झाला होता. या पराभवाचा मोठा परिणाम हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलवर (WTC Point Table) झाला आहे.

भारतीय संघाने सलग दोन वर्षे WTC ची फायनल खेळली होती. पहिल्या 2019 - 21 च्या हंगामात भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्ध अंतिम सामना खेळला होता. तर दुसऱ्या 2021 ते 2023 च्या हंगामात ऑस्ट्रेलियाविरूद्ध अंतिम सामना झाला होता.

आता 2023 ते 2025 च्या हंगामातही भारतीय संघ फायनल गाठण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या पराभवानंतर भारताचं हे मिशन अवघड झालं आहे.

इंग्लंड विरूद्ध भारतीय संघ मायदेशात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. जर या मालिकेतील पाच सामन्यापैकी भारतीय संघ दोन सामने जिंकला आणि दोन हरला आणि एक ड्रॉ झाला तर रोहित सेना WTC पॉईंट टेबलमध्ये बांगलादेशच्याही खाली पाचव्या क्रमांकावर घसरेल.

भारताने वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेने WTC च्या हंगामाची सुरूवात केली होती. 11 जुलैला झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पुढची कसोटी ड्रॉ झाली होती. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेत भारतीय संघाने एक सामना जिंकला अन् एक गमावला होता. आता इंग्लंडसोबतचा पहिलाच सामना गमावल्याने भारताची स्थिती अवघड झाली आहे.

भारत या WTC हंगामात सुरूवातीलाच पिछडीवर पडला आहे. सध्या भारतीय संघ पाचव्या स्थानावर असून आपली स्थिती सुधारण्यासाठी भारताला सातत्याने सामने जिंकावे लागतील. भारत यंदाच्या WTC हंगमातील शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात 5 कसोटी सामने खेळणार आहे.

त्यापूर्वी बांगलादेश दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर मायदेशातच भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

यामुळे भारताचे तिसऱ्यांदा WTC फायनल गाठण्याचे स्वप्न खडतर दिसत आहे. आता इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित 4 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला तर भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास सोपा होऊ शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT