yashasvi jaiswal became emotional after scoring  
क्रीडा

Yashasvi Jaiswal : 'हे फक्त माझ्या आई-वडिलांसाठी...' पदार्पणाच्याच सामन्यात शतक ठोकल्यानंतर जैस्वालचे डोळे पाणावले

Kiran Mahanavar

Yashasvi Jaiswal Wi vs Ind 1st test : आपल्या पहिल्याच सामन्यात जगाच्या लक्षात राहील अशी छाप सोडणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. विंडसर डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात यशस्वीला वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि ती त्याने सोडली नाही. पहिल्याच सामन्यात यशस्वीने शतक झळकावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 143 धावा करून यशस्वी नाबाद परतला. ही खेळी खेळल्यानंतर यशस्वी भावूक झाला आणि डोळेही पाणावले.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यजमान संघाचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा संघ 150 धावांवर गारद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दोन गडी गमावून 312 धावा केल्या आहेत.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यशस्वी म्हणाला की, मी खूप भावूक झालो होतो. माझ्यासाठी... माझ्या कुटुंबासाठी... ज्यांनी मला प्रत्येक प्रकारे साथ दिली त्या सर्वांसाठी. हा एक लांबचा प्रवास आहे, ज्यांनी मला सर्वत्र मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.

तो पुढे म्हणाला की, मी हे माझ्या पालकांना समर्पित करू इच्छितो कारण त्यांनी माझ्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे. मला जास्त बोलायला आवडणार नाही.. मी फक्त आनंदी आहे. ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला पुढे करायचे आहे.

यशस्वीने या खेळीतून अनेक विक्रम केले. यशस्वीची ही धावसंख्या भारताबाहेर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले. गांगुलीने 1996 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध 133 धावांची खेळी केली होती.

पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी भारताचा तिसरा सलामीवीर ठरला आहे. त्याच्या आधी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी हे काम केले होते. यशस्वीने रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. आशियाबाहेर भारताकडून ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections : महायुतीचं ठरलं! भाजप मोठा भाऊ, १५५ जागांवर लढणार? शिंदे-पवारांना 'इतक्या' जागा

IND vs NZ: भारताविरुद्ध लढण्यासाठी CSK ची कशी झाली मदत? शतकवीर रचिन रविंद्रने केला खुलासा

Latest Maharashtra News Updates Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मुक्काम

Railway News: वांद्रे टर्मिनस ते लालकुवादरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन, या तारखे पासुन सुरु होणार आरक्षण

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्राची मोठी डील; 4,100 कोटींना खरेदी करणार परदेशी बँक, शेअर्स वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT