Yashasvi Jaiswal Test Debut Half Century esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal : यशस्वीने अर्धशतकानंतर केलं असं की टीम इंडियाने दिलं स्टँडिंग ओवेशन

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal Test Debut Half Century : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीत यशस्वी जैसवालने अर्धशतक ठोकत आपले कसोटी पदार्पण यशस्वी करून दाखवले. पहिल्या 16 चेंडूत एकही धाव न करणाऱ्या यशस्वीने चौकार मारत आपली कसोटी कारकीर्द सुरू केली. पहिल्या दिवशी 40 धावांवर नाबाद असलेल्या यशस्वीने दुसऱ्या दिवशी आपले अर्धशतक पूर्ण करत रोहित सोबत शतकी सलामी देखील दिली.

विशेष म्हणजे यशस्वी जैसवालने आपले अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर फार सेलिब्रेशन केले नाही. त्याने हवेत उड्या मारल्या नाहीत किंवा आक्रमक हावभाव देखील दाखवले नाहीत. त्याने बॅट उंचावली अन् प्रेक्षकांचे, भारतीय संघाचे अभिवादन स्विकारले. विशेष म्हणजे डावाची सुरूवात चौकाराने करणाऱ्या जैसवालने अर्धशतक देखील चौकार मारतच पूर्ण केले. (Yashasvi Jaiswal News)

यशस्वीच्या या कृतीमुळे तो आपल्या पदार्पणाच्या कसोटीत फक्त अर्धशतकावर समाधानी नाहीये हे दिसून येतो. गेल्या दोन वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या खेळींचा पाऊस पाडणाऱ्या यशस्वीला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठी खेळी करण्याची भूक असल्याचे हे संकेत आहेत. यशस्वीच्या या मानसिकतेला भारतीय ड्रेसिंग रूमने देखील स्टँडिंग ओवेशन दिली.

यशस्वी जैसवाल हा भारताकडून कसोटी पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा आठवा फलंदाज ठरला आहे. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने विंडीजच्या पहिल्या डावाच्या 150 धावांच्या प्रत्युत्तरात दमदार सुरूवात केली आहे.

पहिल्या दिवसाच्या बिनबाद 80 धावांपासून डाव पुढे सुरू करणाऱ्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालने आपली ही भागीदारी शतकपार नेली. यशस्वी जैसवालने सावध सुरूवातीनंतर आक्रमक फलंदाजी करत रोहितच्या आधी आपले अर्धशतक पूर्ण केले. तर रोहितने जैसवालला चांगली साथ देत मोठी भागीदारी रचण्यावर भर दिला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊनही सकाळी...; पालिकेच्या कारवाईवर वर्षा गायकवाड संतापल्या

Period Leave : आता महिला कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा दिवसांची मासिक पाळी रजा; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

IND vs BAN 1st Test : 634 दिवसांनी कसोटी खेळला अन् Rishabh Pant ने झळकावले शतक; महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

Phullwanti Trailer: एकदा पाहा, नजर हटणारच नाही! प्राजक्ताच्या 'फुलवंती'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; कलाकारांच्या लूकने वेधलं लक्ष

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

SCROLL FOR NEXT