World Cup Shubman Gill : एकदिवसीय वर्ल्डकप 2023 चा रणसंग्राम सुरू झाला आहे. दुसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ दिल्लीत पोहोचला आहे. सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केल्यानंतर आता अफगाणिस्तानची पाळी आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
दरम्यान, शुभमन गिल अजूनही चेन्नईतच आहे. सोमवारी त्याला काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर तो हॉटेलमध्ये परतले असल्याचे सांगण्यात येत आहे. गिल संघात कधी परतणार आणि पहिला सामना कधी खेळणार हे सांगणे सध्या कठीण आहे. दरम्यान, शुभमन गिलसाठी बीसीसीआय दोन खेळाडूंच्या नावावर विचार करत असल्याची बातमी आहे. याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात शुभमन गिल खेळला नव्हता. यानंतर तो 11 ऑक्टोबरला म्हणजे उद्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातूनही तो बाहेर जाणार हेही निश्चित आहे. भारतीय संघ 14 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे.
दरम्यान, इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्ताने सर्वांनाच धक्का दिला आहे. शुभमन गिलसाठी कव्हर म्हणून दोन खेळाडूंच्या नावाचा विचार केला जात असल्याचे अहवालात म्हटले आहे. बुधवारी जेव्हा भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल तेव्हा बीसीसीआयचे काही अधिकारी आणि निवड समितीही दिल्लीत असतील. या दरम्यान एखाद्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. यशस्वी जैस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड हे कव्हर म्हणून संघात सामील होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.