Milkha Singh  File Photo
क्रीडा

...म्हणून मिल्खा सिंग यांनी नाकारला होता अर्जुन पुरस्कार

400 मीटर शर्यतीत मिल्खा सिंग यांना केवळ 0.01 सेकंद इतक्या फरकाने पदक गमवावं लागलं होतं.

सुशांत जाधव

फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधनं झालं. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. कोरोनातून बरे होऊन मिल्खा सिंग घरी परतले. मात्र कोरोनानंतर होणारा त्रास वाढला. त्यातच मिल्खा सिंग यांची प्राणज्योत मालवली. मिल्खा सिंग यांचा एक विक्रम एक दोन वर्षे नाही तर चाळीस वर्षे अबाधित होता. रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांना पदक पटकावता आलं नव्हतं. पण नावावर एक विक्रम मात्र नोंदवला होता. (You Know The Flying Sikh Milkha Singh refused to accept the Arjuna Award)

1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ऑलिम्पिकमधील एक विक्रम मोडला होता. त्यावेळी त्यांनी नोंदवलेला राष्ट्रीय विक्रम मोडण्यासाठी 40 वर्षांचा कालावधी गेला. 400 मीटर शर्यतीत मिल्खा सिंग यांना केवळ 0.01 सेकंद इतक्या फरकाने पदक गमवावं लागलं होतं. यावेळी त्यांनी 45.6 सेकंद अशी वेळ नोंदवली होती. तेव्हा मिल्खा सिंग हे ऑलिम्पिकमध्ये सर्वात वेगवान वेळ नोंदवलेले भारतीय धावपटू ठरले होते. त्यांचा हा विक्रम 40 वर्षे कायम होता.

मिल्खा सिंग यांना 1959 मध्ये पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर 2001 मध्ये अर्जुन पुरस्कारही देण्यात आला होता. तेव्हा मिल्खा सिंग यांनी हा पुरस्कार नाकारला होता. त्यांनी म्हटलं होतं की, 'याला 40 वर्षे झालीत आणि खूप उशिर झालाय. तसंच जे पात्र नाहीत त्यांनाही हा पुरस्कार दिलाय. त्यांच्यामध्ये माझं नाव जोडलं जात आहे. मी या पुरस्काराच्या आणि तो ज्या पद्धतीने दिला जातोय त्याच्याविरोधात आहे असंही ते म्हणाले होते. तत्कालीन क्रीडा मंत्री उमा भारती यांनी फोन करून मिल्खा सिंग यांना पुरस्काराबाबत सांगितलं होतं. उमा भारती यांच्यासोबत 15 मिनिटे फोनवर चर्चा केल्यानंतर मिल्खा सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत आपण अर्जुन पुरस्कार घेत नसल्याचं सांगितलं होतं.

'अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. भारत सरकारने 1961 मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. 1958 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत मिल्का सिंग यांनी यश मिळवलं होतं. त्यानंतर मिल्खा सिंग यांना ज्यूनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून भारतीय लष्करात पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर पंजाबच्या राज्य सरकारने त्यांना राज्याच्या शिक्षण विभागात क्रीडा संचालक म्हणून नियुक्त केलं होतं. 1998 पर्यंत मिल्खा सिंग या पदावर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

SCROLL FOR NEXT