Happy Birthday Yuvraj Singh : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन वर्ल्ड कप जिंकले. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. या वर्ल्ड कपमध्ये भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2011 मध्येही धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये धोनी कर्णधार होता पण योद्धा युवराज सिंग विजयाचा मोठा हिरो होता. तोच युवराज सिंग ज्याचा आज वाढदिवस आहे.
2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 6 षटकार ठोकले होते. तर 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये युवीची टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली होती.
2011 च्या वर्ल्ड कपमध्ये युवीने 362 धावा केल्या होत्या आणि 15 महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या होत्या. पण हा वर्ल्ड कप युवीसाठी खूप वेदनादायी होता. त्याने भारतीय संघाला नक्कीच चॅम्पियन बनवले, पण त्या टूर्नामेंटमध्ये त्याची अवस्था फारच बिकट झाली होती. रक्ताच्या उलट्या होत असताना त्याने फलंदाजी केली. तो मैदानावर उभा राहिला आणि त्याने षटकार आणि चौकार मारत भारताला विजेतेपद मिळवून दिले.
2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान युवराजला कर्करोगाने ग्रासले होते, परंतु त्याने आपला आजार लपवून टूर्नामेंटमध्ये खेळला. त्या वर्ल्ड कपमध्ये एकीकडे युवराज मैदानावर गोलंदाजांची धुलाई करत होता, तर दुसरीकडे त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात युवराजच्या तोंडातून रक्त येत होते. युवराजला कॅन्सर झाल्याचे कुणाला पण माहीत नव्हते. तोंडातून रक्त येत असतानाही युवीने या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 65 चेंडूत 57 धावांची नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळली. तसेच 2 विकेट घेतल्या. यामुळे युवीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. भारताने तो सामना 5 विकेटने जिंकला.
कॅन्सरच्या उपचारासाठी युवीला बोस्टनला जावे लागले. वर्षभराहून अधिक काळ चाललेली कॅन्सरची लढाई अखेर युवराजने जिंकली. युवराज क्रिकेटच्या मैदानात परत येऊ शकणार नाही, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत होते. पण युवीने हार मानली नाही आणि कॅन्सरला हरवून जबरदस्त पुनरागमन केले. यानंतर युवीने जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय विक्रम
युवराज सिंगने 304 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने 8701 धावा केल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 14 शतके आणि 52 अर्धशतक. तर युवराजने 40 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1900 धावा केल्या ज्यात 3 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याच वेळी, 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये युवराजच्या बॅटमधून 1177 धावा आल्या. युवीने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार ठोकले होते, जे आजही चाहत्यांच्या मनात आहे. डावखुरा फिरकीपटू युवराजने कसोटीत 9, एकदिवसीय सामन्यात 111 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.