Yuzvendra Chahal Statement On Pakistan Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जी हवा तयार होते ती इतर कोणत्याही सामन्याबाबत तयार होत नाही. ज्याप्रमाणे 2021 च्या टी 20 वर्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानने आपल्या वर्ल्डकपची सुरूवात एकमेकांविरूद्ध खेळून केली होती. त्याचप्रमाणे दोन्ही संघ 2022 च्या टी 20 वर्ल्डकपची सुरूवात एकमेकांविरूद्ध खेळून करणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, या सामन्याच्या हाईपबद्दल भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की आम्ही या सामन्याबद्दल फार विचार करत नाहीये.
दैनिक जागरणाला दिलेल्या मुलाखतीत युझवेंद्र चहलला पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने आम्ही या सामन्याकडे इतर सामन्याप्रमाणेच पाहत आहोत असे सांगितले. चहल म्हणाला की, 'ज्यावेळी तुम्ही एखाद्या संघाविरूद्ध आधीच खेळलेले असता त्यावेळी तुम्हाला पुन्हा त्या संघाशी भिडताना जास्त काळजी करण्याची गरज नसते. माध्यमांमध्ये आणि इंटरनेटवर भारत - पाकिस्तान सामन्याबद्दल मोठी हवा तयार करण्यात आली आहे. पण, आम्हा क्रिकेटपटूंसाठी हा दुसऱ्या सामन्याप्रमाणेच एक सामना आहे. जर आम्ही या सामन्याबद्दल फार विचार करू लागलो तर नक्कीच आमच्यावर दबाव येईल.'
चहल पुढे म्हणाला की, 'मी इंटरनेटवर चांगला सक्रिय असतो. मात्र मी काय लिहिलं जात आहे याबाबत फार काळजी करत नाही. पाकिस्तान हा चांगला संघ आहे मात्र आमचे लक्ष आम्ही आमच्या कामगिरीवर केंद्रीत केले आहे. तुम्ही सामन्यावेळी कशी कामगिरी करता हे सर्वात महत्वाचे असते. सगळ्या गोष्टी त्यावर अवलंबून असतात.' युझवेंद्र चहलने काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्याने टी 20 वर्ल्डकप संघात स्थान पटकावले असून तो ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे ते पाहता पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याची अंतिम 11 च्या संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.