Yuzvendra Chahal On RCB esakal
क्रीडा

Yuzvendra Chahal : मला माझी योग्यता माहिती आहे, मात्र सर्वात वाईट गोष्ट म्हणजे... दोन वर्षांनी युझीने केलं मन मोकळं!

अनिरुद्ध संकपाळ

Yuzvendra Chahal On RCB : भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने भारतीय संघात पुनरागमन केलं असून आता तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघातील एक महत्वाचा सदस्य आहे. मात्र 2021 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने त्याला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता.

चहलने चिन्नास्वामी सारख्या फिरकीसाठी मृत्यूचा सापळा ठरणाऱ्या खेळपट्टीवर आरसीबीची 8 वर्षे यशस्वी सेवा केली होती. मात्र तरी देखील आरसीबीने त्याला रिटेन न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर युझवेंद्र चहलने आता मन मोकळे केले आहे. (Yuzvendra Chahal News)

द रणवीर शो या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत युझवेंद्र चहल ((Yuzvendra Chahal Controversy) RCB ने रिटेन न करण्याबाबत म्हणला की, 'मला नक्कीच वाईट वाटलं. माझा प्रवास हा 2014 मध्ये सुरू झाला होता. पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवला. मात्र फ्रेंचायजीकडून 8 वर्षे खेळल्यानंतरही रिटेन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे.'

'मी लोकं युझवेंद्र चहलने जास्त पैसे मागितले असले असं बोलताना ऐकलं होतं. म्हणूनच मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी कोणतीही मागणी केली नव्हती. मला माहिती आहे की माझी योग्यता किती आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीने साधा एक फोन देखील केला नाही. त्यांनी माला कोणतीही गोष्ट सांगितली नाही.'

चहल मुलाखतीत पुढे म्हणला की आरसीबीने लिलावात चहलसाठी बोली लावण्याचे वचन दिले होते. मात्र फ्रेंचायजीने एकदाही बिडिंगसाठी आपला हात वर केला नाही. अखेर दिल्ली आणि मुंबईमध्ये चहलवर बोली लावण्यासाठी चढाओढ होती. त्यात राजस्थान रॉयल्सने उडी घेत बाजी मारली. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील आरआरने चहलला 6.50 कोटी रूपये बोली लावत आपल्या गोटात खेचलं. (IPL Auction News)

याबाबत चहल म्हणाला की, 'मी आरसीबीसाठी जवळपास 140 सामने खेळलो. मात्र माझ्यासोबत योग्य तो संवाद साधला गेला नाही. त्यांनी मला लिलावात बोली लावण्याचा शब्द दिला होता. मात्र तसं काही झालं नाही. मला खूप राग आला होता. मी आठ वर्षे त्यांच्यासाठी खेळलो. चिन्नास्वामी हे माझे आवडते मैदान आहे.'

युझवेंद्र चहल म्हणाला की राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा मला फायदाच झाला आहे. तो म्हणाला, 'जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. मी राजस्थान रॉयल्समध्ये दाखल झाल्यापासून मी डेथ बॉलर झालो आहे. आरसीबीमध्ये मी जास्तीजास्त 16 ते 17 व्या षटकापर्यंत गोलंदाजी करत होतो.'

'आता आरआरमध्ये मी डेथ बॉलर झालो आहे. माझी 5 ते 10 टक्के क्रिकेटिंग ग्रोथ देखील झाली. त्यावेळी मला जाणीव झाली की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. लोकं एका फ्रेंचायजीकडून 10 वर्षे खेळून देखील ते दुसऱ्या संघात जातात. हे ठिक आहे.

'व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला अशा गोष्टी हाताळता यायला हव्यात. भावनिकदृष्ट्या आरसीबीशी जोडलो गेलो आहे. मात्र राजस्थान रॉयल्सने मला चांगला क्रिकेटपटू बनवलं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT