Zimbabwe vs India 1st ODI : भारत आणि झिम्बावे यांच्यातील पहिल्या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत दुबळ्या झिम्बावेचा डाव झटपट संपवण्यास सुरूवात देखील केली. मात्र भारतीय गोलंदाजांचे हे मनसुबे झिम्बावेच्या ब्राड इव्हान्स आणि रिचर्ड एनग्रावा यांनी उधळून लावले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी विक्रमी 70 धावांची भागीदारी रचली. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच भारताविरूद्ध झिम्बावेच्या जोडीने नवव्या विकेटसाठी इतकी मोठी भागीदारी रचली. (Brad Evans Richard Ngarava 9th Wicket 70 Runs partnership Zimbabwe highest 9th wicket partnership against India)
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेंडू चांगला स्विंग होत होता. त्यामुळे भारतीय संघ झिम्बावेला झटपट गुंडळणार असे वटात होते. झिम्बावेने सावध सुरूवात केली खरी मात्र दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक मारा करत झिम्बावेची अवस्था 8 बाद 110 धावा अशी केली होती. झिम्बावेचा कर्णधार रेगिस चकाब्वाची झुंजार फलंदाजी करत संघाला शतकी मजल मारून दिली होती. त्याने 35 धावांचे योगदान दिले.तो
तो बाद झाल्यानंतर भारत झिम्बावेला गुंडाळून सामना लवकर संपवले असे वाटत असतानाच ब्राड इव्हान्स आणि रिचर्ड एनग्रावा यांनी नवव्या विकेटसाठी झुंजार 70 धावांची भागीदारी रचली. भारताविरूद्धची झिम्बावेची ही नवव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली. अखेर प्रसिद्ध कृष्णाने एनग्रावाला 34 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. ब्राड इव्हान्सने नाबाद 29 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. भारताकडून दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.