Zimbabwe Defeat Pakistan esakal
क्रीडा

PAK vs ZIM : झिम्बाब्वेने पाकिस्तानला रडवले! अवघ्या 1 धावेने विजय मिळवत दिला धक्का

अनिरुद्ध संकपाळ

Zimbabwe Defeat Pakistan : टी 20 वर्ल्डकप 2022 ग्रुप 2 मधील सामन्यात पाकिस्तानने झिम्बब्वेला 130 धावात रोखले. यानंतर हे आव्हान पाकिस्तान लिलया पार करेल असे वाटले होते. मात्र झुंजार झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या फलंदाजीमधील मर्यादा दाखवून दिल्या. झिम्बब्वेने पाकिस्तानचा एक धावेने पराभव करत मोठा धक्का दिला. पाकिस्तानला 131 धावांचे आव्हान पेलवले नाही. झिम्बाब्वेने अवघ्या 1 धावेने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 129 धावांपर्यंतच मजल मारता आली. अखेर झिम्बाब्वेची झुंज यशस्वी ठरली. झिम्बाब्वेकडून अष्टपैलू सिकंदर रझाने 3 विकेट्स घेतल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 44 धावा केल्या.

झिम्बाब्वेचे विजयासाठीचे 131 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला ब्रॅड एव्हान्सने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार बाबर आझमला 13 धावांवर बाद केले. पाठोपाठ मुझारबानीने मोहम्मद रिझवानचा 14 धावांवर त्रिफळा उडवत पाकिस्तानचे दोन्ही स्टार पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दोन्ही अव्वल फलंदाज माघारी गेल्यानंतर अनुभवी शान मसूदने इफ्तिकार अहमद सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र जाँग्वेने इफ्तिकारला 5 धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था 7.4 षटकात 3 बाद 36 धावा अशी केली.

यानंतर आलेल्या शादाब खानने शान मसूदच्या झुंजार खेळीला समर्थ साथ देण्याचा प्रतत्न केला. या दोघांनी चौथ्याव्या षटकापर्यंत पाकिस्तानला 88 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 14 चेंडूत 17 धावा करून अहमदने शानची साथ सोडली. त्याला सिकंदर रझाने माघारी धाडले. रझा फक्त इथंच थांबला नाही. त्याने त्याच 14 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर हैदर अलीला आल्या पावली पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा निम्मा संघ 88 धावात तंबूत परतल्यानंतर पाकिस्तानची सर्व मदार शान मसूदवर होती.

मात्र सिकंदर रझाने आपल्या पुढच्याच षटकात 38 चेंडूत 44 धावा करून एकाकी झुंज देणाऱ्या शान मसूदची फडफड संपवली. रझाची ही तिसरी शिकार होती. पाकिस्तानची अवस्था 6 बाद 96 धावा अशी झाल्यानंतर अष्टपैलू मोहम्मद नवाझवर सर्व पाकिस्तानी चाहत्यांच्या आशा लागून राहिल्या होत्या. सामना आता 18 चेंडूत 29 धावा असा आला होता. नवाझची साथ देण्यासाठी आलेल्या मोहम्मद वसिमने षटकाची सुरूवात चांगली केली. त्याने पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा केल्या. मात्र मुझाराबानीने फक्त 1 धाव दिली. या षटकात पाकिस्तानला फक्त 7 धावाच करता आल्या.

आता पाकिस्तानला 12 षटकात विजयासाठी 12 धावांची गरज होती. स्ट्राईकवर नवाझ होता. नगारवाने पहिल्या तीन चेंडूत चार धावा दिल्या. त्यानंतर नवाझने षटकार मारत हे षटक मोठे करण्याचा प्रयत्न केला. या षटकात पाकिस्तानने 11 धावा केल्या. त्यामुळे आता पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती.

शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवाझने 3 धावा केल्या. त्यानंतर वसिमने चौकार मारत सामना 4 चेंडूत 4 धावा असा आणला. त्यानंतर वसिमने एक धाव केली सामना 3 चेंडूत 3 धावा आली असताना मात्र ब्रॅड इव्हान्सने चौथा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर नवाझ 18 चेंडूत 22 धावा करून षटकार मारण्याच्या नादात बाद झाला. आता पाकिस्तानला विजयासाठी एका चेंडूत 3 धावांची गरज होती. स्ट्राईकवर शाहीन आफ्रिदी होता. ब्रॅडने फक्त 1 धाव दिली. आफ्रिदी दुसरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT