Zimbabwe vs India 1st ODI Live Cricket Score KL Rahul Shikhar Dhawan esakal
क्रीडा

ZIM vs IND 1st ODI : शिखर - शुभमनची अर्धशतके; भारताचा दणदणीत विजय

अनिरुद्ध संकपाळ

ZIM vs IND 1st ODI : भारताने झिम्बावेचे 190 धावांचे आव्हान बिनबाद पार करत तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 10 विकेट्सनी जिंकला. भारताने हे आव्हान षटकातच पार केले. शिखर धवनने नाबाद 81 धावा केल्या तर शुभमन गिलने देखील 82 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

शिखर पाठोपाठ शुभमनचेही अर्धशतक

भारतीय सलामीवीर शुभमन गिलने देखील झिम्बावेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने शिखर धवन सोबत नाबाद दीडशतकी सलामी देत भारताला मोठा विजय मिळवून देण्याच्या दिशेने कूच केली.

 शिखर धवनचे अर्धशतक; भारताची शतकी सलामी 

झिम्बावेने ठेवलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली. शिखर धवनने अर्धशतक ठोकले.

189-10 : झिम्बावेचा डाव संपला

अक्षर पटेलने झिम्बावेचा दहावा फलंदाज नयुचीला 8 धावांवर बाद करत झिम्बावेचा डाव 189 धावात संपवला.

180-9 : अखेर प्रसिद्ध कृष्णाने जोडी फोडली

झिम्बावेच्या इव्हान्स - एनग्रावा जोडीने नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचत झिम्बावेला 180 धावांपर्यंत पोहचवले होते. अखेर प्रसिद्ध कृष्णाने ही जोडी फोडली. त्याने एगग्रावाला 34 धावांवर बाद केले.

झिम्बावेच्या शेपटाने भारताला दमवले

भारताने झिम्बावेची 8 बाद 110 अशी अवस्था केली होती. भारत झिम्बावेचा डाव लवकरात लवकर गुंडाळेल असे वाटले होते. मात्र ब्रॅड एव्हान्स आणि रिचर्ड एनग्रावाने नवव्या विकेटसाठी दमदार अर्धशतकी भागिदारी रचत झिम्बावेला 150 च्या पार पोहचवले.

110-8 : लुक जाँगवे बाद 

अक्षर पटेलने झिम्बावेला अजून एक धक्का देत लुक जाँगवेला 13 धावांवर बाद केले.

107-7 : अक्षरच्या आर्म बॉलने कर्णधाराची झुंजार खेळी संपवली

झिम्बावेचा कर्णधार रेगिस चकाब्वाने 35 धावांची झुंजार खेळी करत संघाला शंभरी पार करून दिली. मात्र अक्षर पटेलने त्याचा त्रिफळा उडवत ही झुंज संपवली.

कर्णधार रेगिस चकाब्वाची झुंजार फलंदाजी 

झिम्बावेच्या फलंदाजांना भारताच्या भेदक माऱ्यासमोर दुहेरी आकडाही गाठता येत नव्हता अशी परिस्थिती कर्णधार रेगिस चकाब्वाने झुंजार खेळी करत संघाला शतकापार पोहचवले.

83-6 : प्रसिद्धने दिला अजून एक धक्का

प्रसिद्ध कृष्णाने रेयान ब्रुलला 11 धावांवर बाद करत झिम्बावेला सहावा धक्का दिला.

66-5 : सिकंदर रझा बाद, झिम्बावेचा निम्मा संघ माघारी 

झिम्बावेचा अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज सिकंदर रझाला प्रसिद्ध कृष्णाने 12 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

31-4 :दीपकची तिसरी शिकार

भारताच्या दीपक चाहरने विजले माधवेरेला 5 धावांवर पायचीत पकडत आपली तिसरी शिकार केली.

31-3 : मोहम्मद सिराजने देखील उघडले खाते

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चांगली गोलंदाजी करून देखील विकेट मिळत नव्हती. अखेर 10 व्या षटकात त्याने सेआन विलियम्सला 1 धावेवर बाद करत आपल्या विकेटचे खाते उघडले.

 26-2 : दीपक चाहरने मरमानीची केली शिकार 

25-1 : दीपक चहरने उघडले खाते

भारतीय संघात जवळपास 7 महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरने अखेर विकेटचे खाते उघडले. त्याने इनोसेंट काईकाला 4 धावांवर बाद केले.

झिम्बावेची सावध सुरूवात

झिम्बावेने पहिल्या 4 षटकात बिनबाद 18 धावा केल्या आहेत.

प्लेईंग इलेव्हनमध्ये चार सलामीवीर 

भारताने झिम्बावे विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला. या संघात केएल राहुल, शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन असे चार सलामीवीर खेळवण्यात आले आहेत. याचबरोबर गोलंदाजीत दीपक चहर आणि कुलदीप यादव बऱ्याच काळानंतर अंतिम 11 च्या संघात दिसत आहेत.

केएल राहुलने नाणेफेक जिंकली

भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि झिम्बावे यांच्यातील पहिला वनडे सामना 

भारत आणि झिम्बावे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (दि. 18 ऑगस्ट) रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 ला सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT